Taliban
TalibanDainik Gomantak

Taliban: भयानक! चोरी केली म्हणून तालिबानने भर स्टेडियममध्ये दिली 'ही' शिक्षा...

कंदाहार येथील फुटबॉल स्टेडियममध्ये सर्वांसमोर दिली 9 जणांना शिक्षा
Published on

Talibani Punishment: अफगाणिस्तानातील तालिबानी राजवट क्रूर शिक्षेसाठी ओळखली जाते. त्यांच्या शिक्षेच्या बातम्या प्रसारमाध्यमांतून समोर येत असतात. आताही असाच एक प्रकार समोर आला आहे.

मंगळवारी तालिबानने कंधाहार येथे नऊ जणांना शिक्षा दिली. त्यातील चार जणांचे भर स्टेडियममध्ये सर्वांसमक्ष हात तोडण्यात आले.

Taliban
Don Dawood Ibrahim: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने केले दुसरे लग्न, पाकिस्तानमधील राहते घरही बदलले

कंदाहारमधील फुटबॉल स्टेडियममध्ये नऊ जणांना सार्वजनिकरित्या शिक्षा देण्यात आली. चोरीच्या गुन्ह्यासाठी चार तरुणांचे हात कापण्यात आले. यासोबतच उर्वरित पाच जणांवर अवैध संबंध असल्याचा आरोप ठेवत त्यांनी चाबकाचे फटके मारण्यात आले.

स्टेडियममध्ये उपस्थित शेकडो प्रेक्षकांसमोर ही शिक्षा दिली गेली. अवैध संबंध ठेवणाऱ्या तरुणांना सुमारे 38 फटके मारण्यात आले. त्यांच्या किंकाळ्या स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या सर्वांनी ऐकल्या.

कंदहारमध्ये शिक्षा हा प्रकार नवीन नाही. अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यापासून अशा शिक्षेची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

Taliban
China Population: साठ वर्षानंतर पहिल्यांदाच चीनची लोकसंख्या घटली; भारताला होणार फायदा?

अशी शिक्षा दिल्याने लोकांच्या मनात भीती निर्माण होईल आणि ते चुकीचे काम करण्यास घाबरतील, असे तालिबानला वाटते.

भविष्यात अशा प्रकारच्या शिक्षा चालू ठेवल्या जातील, जेणेकरून लोक चूक करण्यापूर्वी हजार वेळा विचार करतील, असेही तालिबानने याआधीच स्पष्ट केले आहे.

अमेरिकने सैन्य परतल्यानंतर तालिबानने पुन्हा अफगाणिस्तानचा ताबा घेतला. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या फटके मारण्याची शिक्षा देण्यात आली होती. व्यभिचार आणि घरातून पळून गेल्याप्रकरणी 19 स्त्री-पुरूषांना प्रत्येकी 39 फटके मारण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com