New Dress Code: हाफ-स्लीव्ह, लेगिंग्सला बंदी! भारताशेजारील 'या' देशात महिला-मुलींसाठी नवा ड्रेस कोड; तालिबानी फतवा जारी

Bangladesh Dress Code Policy: बांगलादेशातील महिला आणि मुलींवर आता तालिबानी फतवे लागू केले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Bangladesh Dress Code Policy
Bangladesh Dress Code PolicyDainik Gomantak
Published on
Updated on

Bangladesh Bank Dress Code: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांना देशातून बेदखल केल्यानंतर बांगलादेशही आता तालिबानच्या (Taliban) मार्गावर वाटचाल करत आहे की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे. बांगलादेशातील महिला आणि मुलींवर आता तालिबानी फतवे (Talibani Decrees) लागू केले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ढाका ट्रिब्यूनने (Dhaka Tribune) दिलेल्या वृत्तानुसार, बांगलादेश बँकेने (Bangladesh Bank) आपल्या महिला कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन ड्रेस कोड (Dress Code) लागू केला आहे. या आदेशामुळे महिलांना त्यांच्या आवडीनुसार कपडे घालण्याच्या स्वातंत्र्यावर अनेक प्रकारची बंधने (Restrictions) आली आहेत. बांगलादेशची केंद्रीय बँक असलेल्या बांगलादेश बँकेने हा आदेश जारी केला आहे.

Bangladesh Dress Code Policy
Bangladesh: प्रेषित मोहम्मद पैगंबरांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या हिंदू विद्यार्थ्याला बांगलादेशात अटक

महिला कर्मचाऱ्यांसाठी नवीन 'ड्रेस कोड'चे नियम:

नवीन नियमांनुसार, महिला कर्मचाऱ्यांसाठी खालील निर्बंध लागू करण्यात आले आहेत:

  • हाफ-स्लीव्ह आणि छोटे कपडे, तसेच लेगिंग्स (Leggings) घालण्यावर पूर्णपणे बंदी (Complete Ban) घालण्यात आली आहे.

  • महिलांना साडी, सलवार-कमीजसोबत ओढणी (Dupatta) किंवा इतर व्यावसायिक (Professional) आणि साधे कपडे घालावे लागतील.

  • कपड्यांचा रंग सामान्य (Sober) असावा.

  • फॉर्मल सँडल (Formal Sandals) किंवा बूट आणि साधा हिजाब (Hijab) किंवा स्कार्फ (Scarf) वापरण्याची परवानगी आहे.

  • महिला कर्मचाऱ्यांसोबतच्या व्यवहाराबाबत, 'बांगलादेश बँक स्टाफ रेग्युलेशन 2003' च्या (Bangladesh Bank Staff Regulation 2003) कलम 39 चे (Section 39) पालन करणे बंधनकारक आहे.

आदेशांवर अधिकारी ठेवणार नजर

  • लैंगिक छळाच्या (Sexual Harassment) तक्रारी 30 कार्यालयीन दिवसांच्या (Working Days) आत संबंधित समितीकडे (Concerned Committee) देणे अनिवार्य आहे.

  • कर्मचाऱ्यांना सोशल मीडियावर (Social Media) कार्यालयाच्या निर्देशांचे कठोरपणे पालन करावे लागेल.

  • प्रत्येक कार्यालय, विभाग, प्रकल्प किंवा युनिटमध्ये एका अधिकाऱ्यावर या निर्देशांच्या देखरेखीची जबाबदारी सोपवली जाईल.

  • कोणत्याही नियमांचे उल्लंघन झाल्यास विभागाच्या प्रमुखांना (Head of Department) कळवण्यात येईल, जे संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाईची शिफारस करतील.

Bangladesh Dress Code Policy
Bangladesh: मालदीवच्या वाटेवर बांगलादेश; बेगम खालिदा झिया यांच्या पक्षाने सुरु केले 'इंडिया आऊट' कॅम्पेन

दरम्यान, शेख हसीना यांच्या कार्यकाळात महिलांना तुलनेने अधिक स्वातंत्र्य होते, परंतु आताच्या या आदेशामुळे बांगलादेशातील महिलांच्या (Women) अधिकारांवर गदा येत असल्याचे मानले जात आहे. या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही बांगलादेशची प्रतिमा कशी राहील, याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com