Tawang Clash: तवांगमधील चकमकीवर चीनची पहिली रिअ‍ॅक्शन, सीमा वादावर म्हणाले...

India Vs China: अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये 9 डिसेंबर रोजी भारत-चीन सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षाच्या घटनेनंतर चीनची पहिली रिअ‍ॅक्शन आली आहे.
China
ChinaDainik Gomantak
Published on
Updated on

China Statement on Tawang Clash: अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये 9 डिसेंबर रोजी भारत-चीन सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षाच्या घटनेनंतर चीनची पहिली रिअ‍ॅक्शन आली आहे. एएफपी या वृत्तसंस्थेनुसार, हिंसक चकमकीच्या वृत्तानंतर सीमेवरील परिस्थिती 'स्थिर' असल्याचे चीनने म्हटले आहे.

दरम्यान, अरुणाचल प्रदेशातील (Arunachal Pradesh) तवांग येथे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीचा मुद्दा भारताने उपस्थित केला तेव्हा, चीनने सीमेवरील परिस्थिती 'स्थिर' असल्याचे सांगितले. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन म्हणाले की, 'आम्हाला समजल्याप्रमाणे चीन-भारत सीमेवरील परिस्थिती एकंदरीत स्थिर आहे.' ते पुढे म्हणाले, 'सीमा मुद्द्यावर राजनैतिक आणि लष्करी माध्यमातून चर्चा सुरु आहे.'

China
Amit Shah On India-China Clash: 'काँग्रेसच्या काळातच चीनने भारताची जमीन बळकावली...,' शहांचा घणाघात

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या चकमकीबाबत संसदेत निवेदन दिले

भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी तवांगमध्ये चीन आणि भारतीय सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीवर संसदेच्या दोन्ही सभागृहात सरकारची भूमिका मांडली. ते म्हणाले की, '9 डिसेंबर 2022 रोजी चीनने सीमेवरील तवांग सेक्टरमधील यांगत्से भागात स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय लष्कराने चीनचा हा डाव उधळून लावला. भारतीय लष्कराने पीएलएच्या तुकडीला त्यांच्या पोस्टवर परतण्यास भाग पाडले.'

China
India China Conflict: अरुणाचलमध्ये भारत अन् चीनच्या सैनिकांमध्ये चकमक, अनेक भारतीय जवान जखमी

यासोबतच, संसदेत घटनेची माहिती देताना राजनाथ सिंह यांनी असेही सांगितले की, 'या चकमकीत भारत आणि चीनचे काही सैनिक जखमी झाले आहेत, मात्र कोणीही गंभीर जखमी झालेले नाही. या घटनेत एकही भारतीय जवान शहीद झाला नाही किंवा कोणीही गंभीर जखमी झाले नाही'.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com