President Salva Kiir: दक्षिण सुदानचे राष्ट्रपती गात होते राष्ट्रगीत! पँट झाली ओली, Video पुन्हा व्हायरल...

South Sudan: दक्षिण सुदानचे राष्ट्राध्यक्ष साल्वा कीर मयार्डिट यांची एक व्हिडीओ क्लिप व्हायरल होत आहे.
President Salva Kiir
President Salva KiirDainik Gomantak
Published on
Updated on

President Salva Kiir: दक्षिण सुदानचे राष्ट्राध्यक्ष साल्वा कीर मयार्डिट यांची एक व्हिडीओ क्लिप व्हायरल होत आहे. सुदानमध्ये पत्रकार आणि सरकार यांच्यात जोरदार खडाजंगी सुरु आहे. एवढेच नाही तर राष्ट्रपतींच्या व्हिडिओबाबत दक्षिण सुदानमध्ये सहा पत्रकारांना ताब्यात घेण्यात आले आहे. प्रेस स्वातंत्र्य वॉचडॉग कमिटी टू प्रोटेक्ट जर्नालिस्ट्स (CPJ) नुसार, हे अनधिकृत व्हिडिओ फुटेज जारी केल्याच्या संशयावरुन पत्रकारांना ताब्यात घेण्यात आले आहे.

वास्तविक, राष्ट्रपती साल्वा कीर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला जात आहे, ज्यामध्ये त्यांची पँट ओली दिसत आहे. हा व्हिडिओ एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यानचा आहे. द गार्डियनच्या म्हणण्यानुसार, व्हिडिओमध्ये, दक्षिण सुदानचे राष्ट्राध्यक्ष साल्वा कीर हे देशाच्या राष्ट्रगीतासाठी उभे असलेले दिसत आहेत, तर त्यांच्या पॅंटचा काही भाग ओला दिसत आहे. बहुधा त्यांनी लघुशंका केली असावी.

President Salva Kiir
America: अमेरिकेत शिक्षकावर गोळीबार, 6 वर्षाच्या मुलाला घेतले ताब्यात

पँटमध्ये लघुशंका केली का?

या कार्यक्रमात मीडियाचे कॅमेरे उपस्थित होते, जे संपूर्ण कार्यक्रम कव्हर करत होते. दरम्यान, प्रसारमाध्यमांनी राष्ट्रपतींच्या पॅंटवर कॅमेरे फोकस करुन ही घटना टिपली. राष्ट्रपतींनी पॅंटमध्ये लघुशंका केल्याचा व्हिडीओवरुन सर्वांनाच संशय आला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सुदानच्या लोकांनी साल्वा कीर यांच्या देशाचा कारभार चालवण्याच्या क्षमतेवर सवाल उपस्थित केले. वास्तविक, राष्ट्राध्यक्ष साल्वा कीर मयार्डिट दक्षिण सुदानचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून देशात कोणत्याही प्रकारच्या निवडणुका (Election) झालेल्या नाहीत.

या 6 पत्रकारांना अटक करण्यात आली

ताब्यात घेण्यात आलेल्या पत्रकारांमध्ये कंट्रोल रुम डायरेक्टर जॉबल टॉम्बे, कॅमेरा ऑपरेटर आणि टेक्निशियन व्हिक्टर लाडो, कॅमेरा ऑपरेटर जोसेफ ऑलिव्हर आणि जेकब बेंजामिन, कॅमेरा ऑपरेटर आणि टेक्निशियन मुस्तफा उस्मान आणि कंट्रोल रुम टेक्निशियन चेरबेक रुबेन यांचा समावेश आहे.

President Salva Kiir
America Ohio Shooting: अमेरिकेत पुन्हा गोळीबार, 4 जणांचा मृत्यू, आरोपी फरार

पत्रकार संरक्षण समितीचे प्रतिनिधी मुथोकी मुमो म्हणाले की, सरकारने ही अटक मनमानी पध्दतीने केली आहे. पत्रकारांवर (Journalists) दबाव टाकण्याचा हा प्रयत्न आहे." अधिकार्‍यांनी या सहा पत्रकारांची बिनशर्त सुटका करावी, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com