America Ohio Shooting: अमेरिकेतील ओहायो येथे झालेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला आहे सुरक्षा अधिकारी आरोपीचा शोध घेत आहेत. मॉन्टगोमेरी काउंटीमधील बटलर टाउनशिपमधील पोलिसांनी सांगितले की, गोळीबाराच्या घटनेनंतर अधिकार्यांना या भागात बोलावण्यात आले. या प्रकरणी चार बळींचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
एसयूव्हीमधून पळून गेलेल्या स्टीफन मार्लो (39) नावाच्या व्यक्तीचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. मॉन्टगोमेरी काउंटी कॉरोनर कार्यालयाने शनिवारी पीडितांची ओळख केली असून मृतांची नावं अनुक्रमे, क्लाईड नॉक्स (82), इवा नॉक्स (78), सारा अँडरसन (41) आणि एक 15 वर्षांची मुलगी आहे. गोळीबार कशामुळे झाला याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारच्या आधी गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि गोळीबारात जागीच ठार झालेल्या चार जणांचे मृतदेह बाहेर काढले. या भागात पहिल्यांदाच असा हिंसक गुन्हा झाला आहे, पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. गोळीबाराच्या घटनेमागे काही हेतू होता की काही मानसिक आजारामुळे ही घटना घडली होती या मागच खरे कारण अद्याप कळू शकले नाही.
बटलर टाउनशिप हे 8,000 रहिवाशांचे शहर आहे जे डेटनच्या उत्तरेस 9 मैलांवर आहे. ज्या आरोपीने हा गोळीबार केला त्याची उंची 5 फूट 11 इंच आहे, त्याचे वजन सुमारे 160 पौंड असेल आणि केसांचा रंग तपकिरी आहे, अशी मोहिती पोलिसांना मिळाली आहे. अधिकार्यांचा असा विश्वास आहे की मार्लो, 39, शॉर्ट्स आणि पिवळा टी-शर्ट घातला होता आणि 2007 चा पांढरा फोर्ड एज घेऊन ते पळून गेला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.