Pakistan Election Results 2024: 'इम्रान, नवाज की बिलावल...', कंगाल पाकिस्तानचा कारभारी कोण होणार?

Pakistan Election Results 2024: पाकिस्तान सध्या राजकीय संकटाबरोबर आर्थिक संकटाचा सामना करत आहे.
Imran Khan & Nawaz Sharif & Bilawal Bhutto
Imran Khan & Nawaz Sharif & Bilawal Bhutto Dainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan Election Results 2024: पाकिस्तान सध्या राजकीय संकटाबरोबर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. दरम्यान, पाकिस्तानात 8 फेब्रुवारी रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानापूर्वी लंडनमधील निर्वासन संपवून देशात परतलेले नवाझ शरीफ सहज विजयी होतील आणि चौथ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतील, असे बोलले जात होते. नवाझ शरीफ यांना लष्कराचा मोठा पाठिंबा होता पण निवडणुकीच्या निकालाने परिस्थिती बदलली.

दरम्यान, इम्रान खान (Imran Khan) यांच्या पक्ष पीटीआयला निवडणुकीपासून (Election) दूर ठेवण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले. इम्रान खान यांच्या पक्षाला (पीटीआय) निवडणुकीपासून दूर ठेवण्याचा प्रत्येक प्रयत्न अयशस्वी ठरला आणि पक्षाच्या पाठिंब्याने निवडणूक लढवलेल्या अपक्ष उमेदवारांनी सार्वत्रिक निवडणुकीत बाजी मारली. मात्र, पीटीआय किंवा नवाझ शरीफ यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज यांना बहुमत मिळाले नाही.

Imran Khan & Nawaz Sharif & Bilawal Bhutto
Pakistan Election Results: पाकिस्तानी जनतेने दहशतवादाला नाकारले; हाफिज सईदच्या लेकाचा निवडणुकीत पराभव

दुसरीकडे, पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालाला बरेच दिवस उलटून गेले आहेत, मात्र अद्याप सरकार स्थापनेबाबतचे चित्र स्पष्ट झालेले नाही. पाकिस्तानच्या या निवडणुकीत तीन मोठे पक्ष पीटीआय (स्वतंत्र उमेदवार), पीएमएल (एन) आणि बिलावल भुट्टो यांचा पक्ष पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीएम) सहभागी झाले होते. पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये एकूण 366 जागा आहेत, त्यापैकी फक्त 266 जागांवर थेट मतदान आहे. तर 70 जागा अल्पसंख्याकांसाठी राखीव आहेत, त्यात महिलांसाठी 60 आणि बिगर मुस्लिमांसाठी 10 जागा आहेत.

तसेच, सरकार (Government) स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाकडे 134 जागा असणे आवश्यक आहे. पण पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत 2024 मध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही.

कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या?

पीटीआय (इम्रान खान- 93 जागा

पीएमएल (नवाज)- 75 जागा

पीपीपी (बिलावल भुट्टो) – 54 जागा

MQM- 17 जागा

जमियत उलेमा ए इस्लाम- 4 जागा

Imran Khan & Nawaz Sharif & Bilawal Bhutto
Pakistan Election Results: पाकिस्तानचा नवा 'वजीर-ए-आझम' कोण? तुरुंगात असलेल्या इम्रान यांचा पक्ष 150 जागांवर पुढे

दरम्यान, लष्कराने ज्या प्रकारे नवाझ शरीफ यांना देशात परत आणले होते, त्यामुळे पीएमएल (एन)ला बहुमत मिळेल, अशी अपेक्षा होती. नवाज पुन्हा पाकिस्तानचे पंतप्रधान आणि लष्कराच्या हातातील बाहुले बनतील असे वाटत होते, पण पाकिस्तानी जनतेला नवाझ शरीफ यांना स्पष्ट असा कौल दिला नाही. इम्रान खान यांच्या समर्थनार्थ जनतेने प्रचंड उत्साह दाखवला आणि पीटीआय सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. इम्रान खान यांच्या उमेदवारांनीही निवडणुकीत हेराफेरी केल्याचा आरोप केला आणि मतमोजणीच्या दिवशी मतदान केंद्रांवर हिंसाचार, मतपेटीचे नुकसान आणि मतपत्रिका फाडल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

कोणाचे सरकार स्थापन होणार?

पाकिस्तानमध्ये कोणाचे सरकार स्थापन होणार याबाबतची स्थिती सध्या स्पष्ट झालेली नाही. पाकिस्तानच्या राज्यघटनेनुसार निवडणुकीच्या 21 दिवसांच्या आत अंतर्गत सरकार स्थापन करणे आवश्यक आहे. तीन आठवड्यांचा हा कालावधी 29 फेब्रुवारीला संपत आहे.

Imran Khan & Nawaz Sharif & Bilawal Bhutto
Imran Khan Gets 7 Year Sentence: इम्रान खानला आठवडाभरात तिसरा झटका, कोर्टाने पत्नी बुशरा बीबीसह सुनावली 7 वर्षांची शिक्षा

शाहबाज-बिलावल यांच्यातील 50-50 चा फॉर्म्युला

2022 मध्ये इम्रान खान यांनी विश्वासदर्शक ठराव गमावला तेव्हा शाहबाज शरीफ यांनी बिलावल भुट्टो यांच्या पक्ष पीपीपीसोबत युती केली होती. त्यावेळी, भुट्टो हे शाहबाज शरीफ सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री होते. बिलावल यांना 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत बहुमत मिळवून पंतप्रधान व्हायचे होते परंतु त्यांना बहुमत मिळाले नाही आणि पक्ष केवळ 54 जागांपर्यंत मर्यादित राहिला. बिलावल भुट्टो पंतप्रधानपदासाठी सौदेबाजी करत असल्याची बातमी आहे.

अशा स्थितीत शाहबाज शरीफ आणि बिलावल भुट्टो 3-2 च्या फॉर्म्युल्यावर पंतप्रधान होतील. म्हणजेच शाहबाज तीन वर्षांसाठी आणि बिलावल दोन वर्षांसाठी पंतप्रधान असावेत, असे समीकरण तयार होत आहे.

इम्रान खान यांनी नवाज शरीफला पाठिंबा द्यावा

इम्रान खान यांना शाहबाज शरीफ यांच्या सरकारमध्ये भ्रष्टाचाराच्या शेकडो आरोपांचा सामना करावा लागला आणि ते सध्या भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणात 14 वर्षांच्या शिक्षेतर्गंत तुरुंगात आहेत. इम्रान खान यांना भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांमध्ये तात्काळ जामीन मिळाल्याचे वृत्त आहे, त्यामुळे आघाडी सरकारसाठी आणखी एक समीकरण तयार होताना दिसत आहे.

इम्रान खान सध्या तसे करण्यास नकार देत असल्याचीही शक्यता आहे, परंतु त्यांची सुटका आणि खटले बंद करणे यासारख्या गोष्टी घडल्या तर हे शक्य दिसते. तथापि, पीटीआय नेते बॅरिस्टर गौहर अली खान यांनी म्हटले की, पक्ष पीएमएल-एन किंवा पीपीपीशी कोणतीही तडजोड करणार नाही. ते पुढे म्हणाले की, अशी युती करण्याऐवजी पीटीआय विरोधी पक्षात बसणे पसंत करेल.

Imran Khan & Nawaz Sharif & Bilawal Bhutto
Imran Khan: इम्रान खान तुरुंगातून लढवणार पाकिस्तानातील तीन जागांवरून निवडणूक, पीटीआयने केली घोषणा

इम्रान यांचे अपक्ष उमेदवार फुटणार?

नवाझ शरीफ यांनी सर्व छोट्या पक्षांना एकत्र आणावे, असे दुसरे समीकरण तयार होत आहे. याशिवाय पीटीआयच्या पाठिंब्याने निवडणूक जिंकलेल्या अपक्ष उमेदवारांनाही त्यांनी आपल्या गोटात घ्यावे. त्यांच्यावर दाखल झालेले खटले संपवून त्यांना मंत्रीपद देण्याचे आमिष द्यायला हवे.

पीटीआय समर्थित उमेदवार वसीम कादिर यांनी विजयानंतर नवाझ शरीफ यांच्या पक्षात प्रवेश केल्यामुळे हे समीकरणही तयार होताना दिसत आहे. नवाज ज्या पद्धतीने या दिशेने काम करत आहेत, त्यावरुन हे समीकरणही शक्य वाटत आहे. मात्र, याबाबत पीटीआयचे नेते गौहर अली खान यांनी म्हटले आहे की, इतर सर्व अपक्ष उमेदवार त्यांच्या संपर्कात आहेत आणि ते फक्त पीटीआयसोबतच राहतील.

पाकिस्तानात लष्कराला जे हवं तेच होईल

दरम्यान, पाकिस्तानच्या लष्कराकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. लष्कराचा पाठिंबा असूनही नवाझ शरीफ यांना बहुमत मिळाले नाही. मात्र पाकिस्तानात जे होईल तेच लष्कराला हवे आहे.

पाकिस्तानात सरकार चालवणे सोपे नाही

पाकिस्तान हा राजकीयदृष्ट्या अस्थिर देश राहिला आहे, जिथे आजपर्यंत एकाही पंतप्रधानाने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला नाही. आताही सरकार आणि देश चालवण्यासाठी स्थापन होणाऱ्या सरकारसाठी ते कठीण काम असेल.

Imran Khan & Nawaz Sharif & Bilawal Bhutto
Imran Khan Leaking Confidential Documents: इमरान खान यांच्या अडचणीत वाढ; न्यायालय ठोठावणार मृत्यूदंड?

सरकारसमोरील सर्वात मोठी आव्हाने...

1. कोणत्याही पक्ष/अपक्षांच्या पाठिंब्याने सरकार एकसंध ठेवण्याचे आव्हान.

2. पाकिस्तानमध्ये महागाई शिगेला पोहोचली असून तिथे गरिबी वाढत आहे. अर्थव्यवस्था डळमळीत आहे. महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्यांचा राजकारण्यांवरचा विश्वास उडत चालला आहे. पाकिस्तानातही बेरोजगारी शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे कोणतेही सरकार आले तरी या आघाडीवर तातडीने काम करण्याची गरज आहे.

3. निवडणूक हेराफेरीच्या आरोपांदरम्यान जागतिक स्तरावर विश्वासार्हता प्रस्थापित करण्याचे आव्हानही नवीन सरकारसमोर असेल. पाकिस्तानमध्ये मतदानाच्या दिवशी इंटरनेटवर बंदी घालण्यात आली होती आणि निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. यावर अमेरिकेने चिंता व्यक्त केली असून पाकिस्तानमध्ये निवडणुकीदरम्यान राजकीय हिंसाचार आणि इंटरनेट बंद केल्याचा अमेरिका निषेध करते. अमेरिकेचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर म्हणाले की, 'याचा निवडणूक प्रक्रियेवर नकारात्मक परिणाम झाला आहे. पाकिस्तानच्या न्यायव्यवस्थेने हस्तक्षेप करुन फसवणुकीच्या दाव्यांची सखोल चौकशी करावी.'

4. नवाझ शरीफ, बिलावल भुट्टो किंवा शाहबाज शरीफ यांपैकी कोणीही पंतप्रधान झाले तर इम्रान खान यांच्या लोकप्रियतेला सामोरे जाण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com