कोण होणार पाकिस्तानचा नवा वज़ीर-ए-आज़म? 'या' नावावर विरोधकांनी केला शिक्कामोर्तब

इम्रान खान (Imran Khan) यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांनी बुधवारीच पत्रकार परिषद घेतली.
Shahbaz Sharif
Shahbaz SharifDainik Gomantak
Published on
Updated on

पाकिस्तानमध्ये मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथी घडत आहेत. त्यातच राजकीय वातावरणाचं तापमान चांगलंच वाढल आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची खुर्ची जाणार असल्याच्या चर्चांना उधान आलं आहे. विरोधकांनी संसदेत इम्रान खान (Imran Khan) यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणला आहे. त्यामुळे इम्रान खान आता केवळ काही तासांसाठीच पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान राहणार हे जवळपास निश्चित झालं आहे. खान यांच्या नेतृत्वाखालील पीटीआय (PTI) युतीमध्ये 179 सदस्य होते, परंतु एमक्यूएम-पीसह उर्वरित मित्रपक्षांनी खान यांची साथ सोडल्यानंतर 164 सदस्य शिल्लक राहीले आहेत. दुसरीकडे, विरोधकांचं संख्याबळ 177 झालं आहे. इम्रान खान यांचे 24 खासदार बंडखोर असल्याचं बोललं जातंय, आता अविश्वास ठरावावर विरोधकांनी पाठिंबा दिला नाही तरं सरकार पडेल. म्हणजेच इम्रान खान यांचे सत्तेतून बाहेर जाणे जवळपास निश्चित आहे. (Shahbaz Sharif will be the new Prime Minister of Pakistan, said Bilawal Bhutto Zardari)

दरम्यान, पाकिस्तानच्या संभाव्य नव्या पंतप्रधानांच्या नावाबाबतही चर्चा सुरु झाली आहे. भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष पाकिस्तानच्या राजकीय हालचालीवर लागले आहेत. प्रत्येकाला हे जाणून घ्यायचे आहे की, इम्रान यांचे सरकार पडल्यास पंतप्रधान कोण होणार? चला तर मग जाणून घेऊया...

Shahbaz Sharif
इम्रान खान यांना मोठा झटका, एमक्यूएम पक्षाने विरोधकांशी केली हातमिळवणी

तसेच, इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांनी बुधवारीच पत्रकार परिषद घेतली. यामध्ये पीपीपी अर्थात पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी (Bilawal Bhutto Zardari) म्हणाले, 'लवकरच इम्रान सरकार पडेल. यानंतर शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif) देशाचे नवे पंतप्रधान बनतील. अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा देणारे बहुतांश विरोधी पक्ष शाहबाज शरीफ यांच्यासोबत आहेत. अशा परिस्थितीत शाहबाज शरीफ पुढील पंतप्रधान होण्याची शक्यता आहे. 2018 च्या सार्वत्रिक निवडणुकीत शाहबाज यांना पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज (PML-N) ने पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित केले होते. मात्र, त्यानंतर इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफने (PTI) निवडणुकीत बाजी मारली होती.

Shahbaz Sharif
इम्रान खान यांना सत्ता सोडण्यासाठी 24 तासांचा अल्टिमेटम, विरोधकांचा हल्लाबोल

सभागृहातील विरोधी पक्षनेते

शाहबाज शरीफ यांचे पूर्ण नाव मियां मुहम्मद शाहबाज शरीफ आहे. त्यांचा जन्म 23 सप्टेंबर 1951 ला लाहोरमध्ये झाला. मोठे बंधू नवाझ शरीफ हे पाकिस्तानचे पंतप्रधान राहिले आहेत. नवाझ शरीफ यांच्या काळात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानात गेले होते. सध्या शाहबाज हे पाकिस्तानच्या संसदेत विरोधी पक्षनेते आहेत. ते पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे तीन वेळा मुख्यमंत्रीही राहिले आहेत.

वडील भारतात व्यवसाय करायचे, फाळणीनंतर पाकिस्तानात गेले

शाहबाज यांचे वडील मियां मुहम्मद शरीफ हे व्यापारी होते. ते काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील रहिवासी होते, तर त्यांची आई पुलवामा येथील रहिवासी होती. भारत-पाक फाळणीच्या वेळी शाहबाज यांचे वडील पाकिस्तानात गेले होते.

Shahbaz Sharif
भारताने पाकिस्ताच्या पंतप्रधान इम्रान खान यांना फटकारले

नवाझ शरीफ यांच्याशिवाय शाहबाज यांना आणखी एक मोठा भाऊ अब्बास शरीफ आहे. शाहबाज यांनी 1973 मध्ये चुलत बहीण नुसरत शाहबाजशी लग्न केले होते. त्यांना सलमान, हमजा, जवेरिया आणि राबिया अशी चार मुले होती. 2003 मध्ये शाहबाजने तेहमीना दुर्राणीसोबत दुसरे लग्न केले.

शाहबाज शरीफ यांच्या राजकीय कारकिर्दीची अशी झाली सुरुवात

शाहबाज यांनी लाहोरमधील सरकारी महाविद्यालयात शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी व्यावसायिक म्हणून करिअरला सुरुवात केली.

  • 1985 मध्ये ते लाहोर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष बनले. येथून त्यांनी राजकारणात प्रवेश केला.

  • 1987 मध्ये त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. 1988 मध्ये पहिली निवडणूक लढवली आणि जिंकली.

  • 1997 मध्ये ते पहिल्यांदाच पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर 2008 आणि 2013 मध्ये ते पुन्हा मुख्यमंत्री झाले.

  • 2018 मध्ये, पाकिस्तान मुस्लिम लीगची कमान हाती घेतली आणि अध्यक्ष बनले.

  • 2018 च्या निवडणुकीत पराभवानंतर त्यांची संसदेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली.

Shahbaz Sharif
पाकिस्तानचे PM इम्रान खान यांनी मुस्लिम देशांबाबत व्यक्त केली नाराजी

तुरुंगात गेले आहेत

शाहबाज 2020 मध्ये मनी लाँड्रिंगच्या (Money laundering) एका प्रकरणात तुरुंगातही गेला आहे. 2021 मध्ये त्यांना जामीन मिळाला होता. तेव्हा राजकीय द्वेषामुळे आपल्याला गोवण्यात येत असल्याचे शाहबाज म्हणाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com