इम्रान खान यांना मोठा झटका, एमक्यूएम पक्षाने विरोधकांशी केली हातमिळवणी

मुत्ताहिदा क्वामी मूव्हमेंट पाकिस्तान (MQM) ने पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) सोबत हातमिळवणी केली आहे.
Imran Khan
Imran KhanDainik Gomantak
Published on
Updated on

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा झटका बसला आहे. इम्रान यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाबरोबर युतीत असणाऱ्या मुत्ताहिदा क्वामी मूव्हमेंट पाकिस्तान (MQM) ने पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) सोबत हातमिळवणी केली आहे. त्यामुळे पाकिस्तान (Pakistan) संसदेच्या कनिष्ठ सभागृहात इम्रान सरकारने बहुमत गमावले आहे. पीपीपीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी (Bilawal Bhutto Zardari) यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले की, "संयुक्त विरोधी पक्ष आणि एमक्यूएममध्ये एक करार झाला आहे. राबता समिती एमक्यूएम आणि पीपीपी सीईसी या कराराला मान्यता देतील. यानंतर आम्ही उद्या पत्रकार परिषदेत मीडियाशी चर्चा करु." तपशीलवार माहिती शेअर करु. अभिनंदन पाकिस्तान." (Imran Khan government loses support of alliance partner MQM ahead of no trust vote likely to resign today)

दरम्यान, 177 सदस्यांसह, विरोधी पक्षाकडे आता नॅशनल असेंब्लीमध्ये मोठ्या संख्येने समर्थक आहेत. तर दुसरीकडे पाकिस्तानच्या संसदेत फक्त 164 सदस्य उरले आहेत. वास्तविक, पाकिस्तानी नॅशनल असेंब्लीमध्ये एकूण 342 सदस्य आहेत, ज्यामध्ये बहुमतासाठी 172 सदस्यांची आवश्यकता आहे. पीटीआयच्या नेतृत्वाखालील आघाडीला 179 सदस्यांचा पाठिंबा होता. परंतु आता एमक्यूएम-पीने पक्ष सोडल्यानंतर पीटीआयकडे केवळ 164 सदस्य उरले आहेत. त्याचवेळी, नॅशनल असेंब्लीमध्ये विरोधकांसह समर्थकांची संख्या आता 177 झाली आहे.

Imran Khan
Pakistan: इम्रान खान यांची पत्नी सरकार वाचवण्यासाठी जाळतेय जिवंत कोंबड्या!

तसेच, काही लोक विदेशी निधीच्या मदतीने आपले सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप इम्रान खान यांनी यापूर्वी केला होता. पीएम इम्रान खान (Imran Khan) आपल्या रॅलीत म्हणाले होते, ''परकीय पैशातून पाकिस्तानमध्ये सरकार बदलण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आपल्याच माणसांचा वापर केला जात आहे. बहुतेक नकळत, परंतु काही लोक आपल्या विरुद्ध पैशांचा भरमसाठ वापर करतायेत. आमच्यावर दबाव आणण्याचा देखील विरोधकांकडून प्रयत्न केला जातोय. आम्हाला लेखी धमकीही देण्यात आली आहे. परंतु आम्ही राष्ट्रीय हिताशी तडजोड करणार नाही.''

Imran Khan
''इम्रान खान अन् पत्नी बुशरा बीबीने घेतली सहा अब्जांची लाच''

जिओ टीव्हीच्या वृत्तानुसार, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात 3 एप्रिल रोजी अविश्वास प्रस्ताव येण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com