

Houthi Rebels Saudi Aramco Missile Attack: सौदी अरब आणि इराण समर्थित हूती बंडखोर यांच्यातील संघर्ष आता अत्यंत धोकादायक वळणावर पोहोचला. मंगळवारी उशिरा रात्री जगातील सर्वात मोठ्या कच्च्या तेलाची निर्मिती करणाऱ्या ‘सौदी अरामको’ कंपनीच्या इमारतीला बॅलिस्टिक क्षमतेच्या क्षेपणास्त्राने टार्गेट केले. या भीषण हल्ल्यानंतर इमारतीच्या एका भागात मोठी आग लागली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्निशामक दल आणि मदत पथकांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. 'एसपीए' ने ऊर्जा मंत्रालयाच्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने ही माहिती दिली. या हल्ल्यात कंपनीच्या मुख्य कार्यालयाच्या वरच्या तीन मजल्यांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अरामकोचा हा परिसर कच्च्या तेलाचे संशोधन, पाईपलाईन नेटवर्क आणि निर्यातीचा मुख्य कणा मानला जातो. सौदी सैन्याच्या एअर डिफेंन्स सिस्टीमने ही मिसाइल हवेतच पाडण्याचा प्रयत्न केला. याशिवाय राजधानी रियाद (Riyadh) आणि देशाच्या दक्षिण सीमेवरही हूती बंडखोरांनी डागलेले अनेक विस्फोटक ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट करण्यात आल्याची पुष्टीही झाली.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सौदीच्या प्रमुख ठिकाणांवर आणि विमानतळांवर सतत होणाऱ्या अशा ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे आखाती देशांमध्ये सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, यामुळे युद्धाचे ढग अधिक दाट झाले आहेत.
विशेष म्हणजे, हा ताजा हल्ला होण्यापूर्वीच सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय मंत्रिमंडळ बैठकीत हूती बंडखोरांच्या सततच्या कारवायांमुळे तीव्र शब्दांत इशारा देण्यात आला होता. असे असूनही हल्ल्यांची मालिका सुरुच असल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर चिंता व्यक्त केली जात आहे. जगातील तेल पुरवठ्याच्या मुख्य केंद्रावर झालेला हा हल्ला जागतिक अर्थकारणासाठी आणि ऊर्जा सुरक्षेसाठी अत्यंत संतापजनक मानला जात असून, या वाढत्या तणावामुळे मध्य पूर्वेतील शांतता धोक्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.