Saudi Arabia लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच उमरा यात्रेसाठी देणार परवानगी

सोमवारपासून संपूर्ण लसीकरण केलेल्या विदेशी यात्रेकरुंना किंगडमला भेट देता येणार आहे.
Mecca
MeccaDainik Gomantak
Published on
Updated on

जगभरात कोरोनाचा कहर सुरु असताना दुसरीकडे सौदी अरेबियाने (Saudi Arabia) मक्का शहरात (Mecca) उमरा यात्रेसाठी (Umrah pilgrimage) सोमवारपासून संपूर्ण लसीकरण केलेल्या विदेशी यात्रेकरुंना किंगडमला भेट देता येणार आहे. सौदी अधिकारी सोमवारपासून प्रवासाच्या विनंत्या स्वीकारणार आहेत. वाढत्या कोरोना केसेसमुळे किंगडमने (Kingdom) 18 महिन्यांपूर्वी आपल्या सीमा बंद केल्या होत्या. मात्र आता लसीकरण केलेल्या विदेशी पर्यटकांना 1 ऑगस्टपासून देशात प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली आहे. गेल्या महिन्यात केवळ 60,000 लसीकरण केलेल्या रहिवाशांना हजमध्ये (Hajj) सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली होती. हज ही मुस्लिम (Muslim) बांधवासाठी पवित्र तीर्थयात्रा मानली जाते, जी मुसलमान बांधवांनी त्यांच्या आयुष्यात एकदा तरी केली पाहिजे असा प्रघाद आहे.

Mecca
Afghanistan: तालिबानला टक्कर देतेय 'ही' अफगाण लेडी; जाणून घ्या

त्याचबरोबर, वर्षाच्या कोणत्याही वेळी उमरा तीर्थयात्रा करता येते आणि जगभरातून लाखो लोक या यात्रेसाठी सौदी अरेबियाला पोहोचतात. यात्रेकरु पवित्र मदिना शहरालाही भेट देऊ शकतात. सरकारी संचलित सौदी प्रेस एजन्सी (एसपीए) ने सांगितले की, सुरुवातीला सौदी अरेबिया दरमहा फक्त 60,000 यात्रेकरुंना उमरा करण्यास परवानगी देईल. यानंतर ते दरमहा 20 लाख भाविकांपर्यंत वाढवले जाईल. परंतु प्रवाशांना सौदी अरेबियाने मंजूर केलेली लस घ्यावी लागणार आहे. किंगडमने फायझर/बायोटेक, ऑक्सफोर्ड-एस्ट्राझेनेका, मॉडर्ना आणि जॉन्सन अँड जॉन्सन लसींना मान्यता दिली आहे.

Mecca
'त्या' अणुबॉम्बच्या स्फोटने जपानसह सर्व जग कसे हादरले; जाणून घ्या

कोरोनामुळे 8,300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला

एसपीएने उप हज मंत्री अब्दुलफत्तह बिन सुलेमान मशात (Abdul Fattah bin Suleiman) यांच्या हवाल्याने सांगण्यात आले की, परदेशी पर्यटकांना आवश्यकता पडल्यास त्यांना क्वारंटाईनमध्ये जावे लागू शकते. सौदी अरेबियामध्ये आतापर्यंत 5,32,000 कोरोनाव्हायरसच्या केसेस नोंदवल्या गेल्या आहेत. आतापर्यंत कोविडमुळे 8,300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. सौदी अरेबियाने म्हटले आहे की, ते कोरोनाव्हायरसमुळे मरण पावलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना भरपाई देईल. गेल्या वर्षीच सांगण्यात आले होते की, पीडितांच्या कुटुंबियांना पाच लाख रियाल दिले जातील. तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी रियाधने आपला पर्यटन उद्योग उभारण्यासाठी कोट्यवधी डॉलर्स खर्च केले आहेत.

Mecca
Afghanistan मध्ये तालिबानची पकड मजबूत; सरकार नियंत्रित शहर घेतलं ताब्यात

किंगडममध्ये 97.5 लाख पूर्ण लसीकरण झाले

सौदी अरेबिया सरकारने आपली लसीकरण मोहीम तीव्र केली आहे, जेणेकरुन पर्यटनासह कोरोनामुळे प्रभावित झालेले इतर क्षेत्र पुनरुज्जीवित होऊ शकतील. सरकारी आणि खाजगी संस्थांमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी लसीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. यात शैक्षणिक संस्था, मनोरंजन स्थळे आणि सार्वजनिक वाहतूक यांचाही समावेश आहे. सौदी अरेबियात, सुमारे 29 दशलक्ष लोकांना लसीचा किमान एक डोस देण्यात आला आहे. त्याच वेळी, पूर्णपणे लसीकरण झालेल्या लोकांची संख्या 97.5 लाख आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com