Afghanistan: तालिबानला टक्कर देतेय 'ही' अफगाण लेडी; जाणून घ्या

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानचा (Taliban) मुकाबला करण्यासाठी देशातील महिला आता अफगाण सैन्यांबरोबर मैदानात उतरल्या आहेत.
Salima Mazari
Salima MazariDainik Gomantak
Published on
Updated on

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानचा (Taliban) मुकाबला करण्यासाठी देशातील महिला आता अफगाण सैन्यांबरोबर मैदानात उतरल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे सलीमा मझारी (Salima Mazari). ती पुरुष प्रधान असलेल्या अफगाणिस्तानमधील एका जिल्ह्याची गव्हर्नर आहे, ज्या सध्या तालिबानशी लढण्यासाठी पुरुषांची भरती करण्याच्या उद्देशाने कार्यरत आहेत. त्या प्रवास करत असलेल्या पिकअप वाहनात एक स्थानिक अफगाण संगीत वाजत आहे. ज्यात अफगाण मातृभूमीविषयी गुणगाण करण्यात आले आहे. त्या गाण्याचे बोल असे आहेत. 'मातृभूमी ... मी तुझ्यासाठी माझे प्राण अर्पण करतो.' आणि साक्षात गाण्याचे बोल या सलीमा मजारी जगत आहेत.

Salima Mazari
Afghanistan मध्ये तालिबानची पकड मजबूत; सरकार नियंत्रित शहर घेतलं ताब्यात

तालिबाने अफगाणिस्तानमधील ग्रामीण भागापासून ताबा घेण्यास सुरुवात केली असून सध्या त्यांनी दोन प्रांताच्या राजधान्यांवर आपले वर्चस्व स्थापन केले आहे. ही तीच वेळ आहे, जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी अमेरिकी सैन्य या युद्धग्रस्त भूमितून माघार घेण्याची घोषणा केली आणि आपल्या सैनिकांना देशात परत जाण्याचे आदेश दिले. तेव्हापासून अफगाणिस्तानातील नागरिकांचे पुरते जीवन बदलले आहे. सलीमा मजारी बाल्ख प्रांतातील (Province of Balkh) चारकिंट जिल्ह्याच्या राज्यपाल आहेत, जे मजार-ए-शरीफच्या दक्षिणेला सुमारे एक तासाच्या अंतरावर आहे. हा डोंगराळ भाग आहे.

Salima Mazari
Afghanistan: तालिबान्यांनी कंधार विमातळावर डागले रॉकेट

तालिबान मानवी हक्क पायदळी तुडवतो

मजारी यांनी एएफसी या वृत्तसंस्थेला सांगितले, 'तालिबान हाच मानवी हक्कांना पायदळी तुडवतो (तालिबानमधील महिलांची परिस्थिती). तालिबानच्या अधिपत्याखाली महिला आणि मुलींना शिक्षण आणि रोजगाराची सोय नाही, पण 2001 मध्ये त्यांच्या पतनापासून बरेच काही बदलले आहे. सामाजिकदृष्ट्या लोक महिला नेत्यांना स्वीकारण्यास तयार नव्हते. मोठा चष्मा आणि फुलपाखरु डिझाईनचा स्कार्फ परिधान महिला राज्यपाल मजारी तालिबानच्या विरोधात एकत्र येण्याचे आवाहन करत आहेत.

Salima Mazari
Afghanistan वर चर्चेसाठी रशियाचे भारताला निमंत्रण नाही; चीन, पाकिस्तान राहणार उपस्थित

सलीमा मझारी या हजारा समाजातून येतात

सलीमा मझारी हा हजारा समुदायातून येतात. हा बहुतेक शिया मुस्लिम समुदाय आहे. ज्यांना सुन्नी तालिबान त्यांच्या धर्माच्या विरोधात मानतात. या समुदायाच्या लोकांवर तालिबान आणि इस्लामिक स्टेटकडून दररोज हल्ला केला जातो. असाच एक हल्ला मे महिन्यात राजधानीतील एका शाळेवर करण्यात आला होता, ज्यामध्ये 80 हून अधिक मुलींचा मृत्यू झाला होता. त्याच वेळी, ज्या जिल्ह्याचा मझारी राज्यपाल आहे त्यापैकी निम्मा जिल्हा आधीच तालिबानच्या ताब्यात आला आहे. म्हणूनच ती उर्वरित क्षेत्राच्या संरक्षणासाठी सेनानींची भरती करण्यात मग्न आहे. शेतकरी, मेंढपाळ आणि मजुरांसह शेकडो स्थानिक लोकांनी त्यांना पाठिंबा देण्याचे मान्य केले आहे.

Salima Mazari
Afghanistan: राजधानी काबूल बॉम्ब स्फोटाने हादरले, संरक्षण मंत्र्यांच्या घरावरही हल्ला

लोकांनी शस्त्रांसाठी जमीन विकली

मझारी म्हणतात, “आमच्या लोकांकडे बंदुका नव्हत्या पण त्यांनी जाऊन त्यांच्या गाई, मेंढ्या आणि अगदी जमीन विकून हत्यारे खरेदी केली. ते रात्रंदिवस आघाडीवर असतात, जेव्हा त्याला त्यासाठी कोणतेही क्रेडिट किंवा पगार मिळत नाही. '' जिल्हा पोलीस प्रमुख सईद नजीर यांचे मत आहे की, तालिबान येथे आपले पाय पूर्णपणे पसरवू शकला नाही कारण स्थानिक लोक त्याचा विरोध करत आहेत. (स्थानिक लोक तालिबानशी लढतात) हे यश केवळ स्थानिक लोक पाठींबा देत असल्यामुळे मिळत आहे. मझारी यांनी आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे 600 स्थानिकांना पारंपारिक सुरक्षा दल म्हणून भरती केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com