Saudi Arabia: सौदी राजपुत्राच्या भावाची पाश्चात्य देशांना धमकी, 'आम्ही जिहादसाठी बनलोय...'

Saudi Arabia: सध्या जगभरातील विविध देशांमध्ये तणाव वाढत आहे.
Saud al-Shalan
Saud al-ShalanDainik Gomantak

America-Saudi Arabia Conflict: सध्या जगभरातील विविध देशांमध्ये तणाव वाढत आहे. आता नवा वाद सौदी अरेबिया आणि अमेरिका यांच्यात सुरु झाला आहे. दोन्ही देशांमधील संबंध पुन्हा बिघडताना दिसत आहेत. अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर आता सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांचे बंधू सौद अल-शालान यांनी सौदी अरेबियाला 'चॅलेंज' देणाऱ्यांना धमकी दिली आहे. ते म्हणाले की, 'जे पण आमच्या अस्तित्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न करेल... आम्ही जिहाद करण्यासाठीच तयार झालो आहोत.'

येथून वादाला सुरुवात झाली

खरे तर, काही दिवसांपूर्वी ओपेक प्लस समूहाने तेल उत्पादनात दररोज 2 दशलक्ष बॅरल कपातीची घोषणा केली, ज्यामुळे वॉशिंग्टन आणि रियाध यांच्यातील तणाव वाढला. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सौदी अरेबियावर रशिया आणि व्लादिमीर पुतिन यांना सहकार्य केल्याचा आरोप केला होता. बायडन म्हणाले होते की, 'अमेरिका सौदी अरेबियासोबतच्या संबंधांवर "पुनर्विचार" करेल.'

Saud al-Shalan
Saudi Arabia: सौदी अरेबियाने महिलांना दिला आणखी एक हक्क, पुरुष जोडीदाराशिवायही...

सध्या अमेरिका आणि सौदी अरेबिया यांच्यात तणाव वाढला तर अमेरिकन नागरिकांना महागडा गॅस खरेदी करावा लागू शकतो. त्याचवेळी संतप्त झालेल्या जो बायडन यांनी सौदी अरेबियावर रशियाला मदत केल्याचा आरोप केला. त्याचवेळी सौदी अरेबियाला त्याचे परिणाम भोगावे लागतील, असेही बायडन म्हणाले होते.

'देशाला आव्हान देणाऱ्यांचे ऐका...'

बायडन यांच्या आरोपांना उत्तर देताना सौदी राजपुत्राचे बंधू म्हणाले की, 'माझे पश्चिमेकडील देशांना उत्तर आहे की... आमच्या अस्तित्वाला जो कोणी आव्हान देईल... आम्ही जिहादसाठी तयार आहोत. काही लोकांना वाटते की, ते आम्हाला घाबरवू शकतात, त्यांना माझा हा संदेश आहे.'

Saud al-Shalan
Saudi Arabia: सोशल मीडियाचा वापर केल्याप्रकरणी सौदी महिलेला 45 वर्षांची शिक्षा

तसेच, सौदी अरेबिया हा ओपेक प्लस समूहाचा सर्वात प्रमुख सदस्य देश आहे. त्यात रशियाचाही समावेश आहे. युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियाला मदत करण्यासाठी सौदी अरेबियाने तेल उत्पादनात कपात करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप अमेरिकेने केला, जेणेकरुन जगाचे रशियन गॅसवरील अवलंबित्व वाढेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com