Saudi Arabia: रमजानमध्ये कुराण जाळल्याने इस्लामिक देश भडकले; सौदी अरेबियाने...

Saudi Arabia: उग्रवाद आणि द्वेष पसरवणारी गोष्टी संपवण्यासाठी त्यांनी आवाहन केले आहे.
Saudi Arabia
Saudi ArabiaDainik Gomantak
Published on
Updated on

Saudi Arabia: सौदी अरेबियाचे राजा सलमान बिन अब्दुलअजीज यांनी रमजानच्या महिन्यात डेन्मार्कमध्ये तुर्की दूतावासासमोर कुराणची प्रत जाळल्याचा कडक शब्दात संताप व्यक्त केला आहे.

धुर-दक्षिणपंथी रासमस पलुदन यांनी कुराणची प्रत जाळल्यानंतर सन्मान आणि सहिष्णुता ही मूल्ये मजबूत करण्यावर भर देण्यास सांगितले. याबरोबरच उग्रवाद आणि द्वेष पसरवणारी गोष्टी संपवण्यासाठी त्यांनी आवाहन केले आहे.

Saudi Arabia
Earthquake In Afghanistan: अफगाणिस्तान पुन्हा हादरलं! रिश्टल स्केलवर 4.3 एवढी तीव्रता

इस्लामविरोधी नेता रासमस पलुदन कोपनहेगनमध्ये तुर्की दूतावासाच्यासमोर कुराणची प्रत जाळली आहे. पलुदानच्या म्हणण्यानुसार, तो दरशुक्रवारी तुर्की दूतावासाच्यासमोर अशीच प्रत जाळेल जोपर्यत स्वीडनचा नाटोमध्ये समावेश केला जात नाही.

दरम्यान, स्वीडनला नाटोमध्ये सामील करण्यामध्ये तुर्की( Turkey ) अडचण निर्माण करत असल्याने आपण हे करत आहोत असेही त्यांनी म्हटले आहे.

पलुदनने याआधीदेखील जानेवारीमध्ये कुराणचा अपमान केला होता. स्वीडनमध्ये एका कुराणच्या प्रतिवर उभे राहून दुसरी प्रत फाडली होती. सौदी अरेबियाच्या विदेश मंत्रालयाने यावर नाराजी व्यक्त करत संवाद, सहिष्णुता आणि सन्मानाच्या मुल्यांवर भर देण्याचे आवाहन केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Carlos Ferreira On Hat Katro Khamb
Supreme Court Notice to ECI
Air Arabia Sharjah to Goa | Goa Mopa airport flight
Why Holi is not celebrated in Kharahari
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com