Imran Khan
Imran Khan Dainik Gomantak

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान विरुद्ध आज अविश्वास ठराव

आपण पायउतार झाल्यास गप्प बसणार नाही, असा इशारा इम्रान खान यांनी विरोधकांना दिला आहे.
Published on

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना पदावरून हटवण्यासाठी विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला आहे. या प्रस्तावावर आज म्हणजेच 25 मार्च रोजी पाकिस्तानच्या संसदेत चर्चा होणार आहे. संसदेचे अध्यक्ष असद कैसर यांनीही सभागृहाचे अधिवेशन बोलावण्याचे आदेश जारी केले आहेत.

Imran Khan
युक्रेनी लष्कराकडून रशियाचे जहाज नष्ट

पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या सुमारे 100 खासदारांनी 8 मार्च रोजी राष्ट्रीय संसदेत अविश्वास प्रस्ताव दिला. देशातील आर्थिक संकट आणि महागाईला इम्रान यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) सरकार जबाबदार असल्याचा आरोप यात करण्यात आला आहे. इम्रान खान यांनी 2018 मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली होती.

21 मार्चला अधिवेशन बोलावण्याची मागणी विरोधकांनी केली होती, मात्र 22 मार्चपासून संसद भवनात सुरू होत असलेल्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (OIC) च्या बहुचर्चित 48 व्या शिखर परिषदेमुळे अधिवेशन बोलवता आले नाही. सुरुवातीला अधिवेशन वेळेवर न बोलावल्यास उपोषण करण्याचा इशारा विरोधकांनी दिला होता, मात्र नंतर अधिवेशन बोलवण्याचे मान्य करण्यात आले. पाकिस्तानमधील राजकीय गोंधळामुळे ओआयसीच्या कार्यक्रमावर परिणाम होऊ दिला जाणार नाही, असे विरोधकांनी म्हटले होते.

Imran Khan
रशियातील इन्फोसिसच्या उपस्थितीमुळे ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक यांना विचारण्यात आले खासगी प्रश्न

इम्रान खान यांच्याकडे बहुमत नाही
पाकिस्तानातील सत्तेचे आकडे बघितले तर इम्रान यांना यापूर्वी 176 खासदारांचा पाठिंबा होता, मात्र 24 खासदारांच्या बंडखोरांनंतर आता केवळ 152 खासदार इम्रान सरकारसोबत उभे आहेत. म्हणजेच 342 सदस्यांच्या नॅशनल असेंब्लीच्या 172 च्या आकड्यापेक्षा इम्रान खान खूपच मागे आहेत.

इम्रानने विरोधकांनाही दिली धमकी
आपण पायउतार झाल्यास गप्प बसणार नाही, असा इशारा इम्रान खान (Imran Khan) यांनी विरोधकांना दिला आहे. माझे सरकार हटवले तरी मी माझ्या तत्त्वांशी तडजोड करणार नाही. मी लोकांना आणि देवाला फसवू शकत नाही. आपला पक्ष पाकिस्तान (Pakistan) तहरीक-ए-इन्साफची लोकप्रियता वाढली असल्याचा दावाही त्यांनी केला. ते म्हणाले, 60-65 टक्के लोक माझ्या पाठीशी उभे आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com