भारत आणि श्रीलंका दरम्यानची उड्डाणे लवकरच सुरू होणार

श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी मंगळवारी जाफना ते भारताची उड्डाणे लवकरच पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली.
flight
flightdainikgomantak
Published on
Updated on

श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी मंगळवारी सांगितले की, भारत सरकारने दिलेल्या नवीन कर्ज सुविधेमुळे देशाला जुलैपासून आणखी चार महिने इंधन खरेदी करण्यात मदत होईल. त्याच वेळी, 3,500 टन एलपीजीची खेपही श्रीलंकेत पोहोचली आहे. (Sri Lanka Economic Crisis)

या खेपेतून मिळालेल्या गॅसचा पुरवठा रुग्णालये, हॉटेल्स इत्यादींना केला जाईल. 'न्यूज फर्स्ट' वेबसाइटच्या वृत्तानुसार, विक्रमसिंघे म्हणाले की, पुढील खेपेमध्ये एलपीजी चार महिन्यांसाठी उपलब्ध असेल. आम्हाला ही खेप मिळण्यासाठी 14 दिवस लागतील. इंधनाचा पुरवठा कायम राहील याची आम्ही खात्री करू, मात्र आमच्या सध्याच्या मागणीच्या केवळ 50 टक्केच ते पूर्ण करू शकेल. त्यामुळे वीज निर्मिती, वाहतूक आणि इतर अत्यावश्यक सेवांना प्राधान्य दिले जाईल, असे विक्रमसिंघे यांनी सांगितले.

flight
गौतम अदानींची मोठी डील: फ्रेंच ऊर्जा कंपनी करणार अदानी समूहात गुंतवणूक

भारत आणि श्रीलंका दरम्यानची उड्डाणे कधी सुरू होणार?

श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी मंगळवारी जाफना ते भारताची उड्डाणे लवकरच पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली. अधिकाधिक भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी लंकेने आपल्या पर्यटन विभागासाठी योजना तयार करण्यास सांगितले आहे.

श्रीलंका पर्यटन विकास प्राधिकरणाने सांगितले की 2022 च्या उर्वरित कालावधीत 800,000 पर्यटकांना आकर्षित करण्याची त्यांची योजना आहे. पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी प्रवासाच्या सुविधेसाठी जाफनाच्या पलाली विमानतळावरून भारतीय गंतव्यस्थानांसाठी उड्डाणे पुन्हा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.

flight
अदानी ग्रुप आणि पंतप्रधान मोदींबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या श्रीलंकन ​​अधिकाऱ्याचा राजीनामा

श्रीलंकेत भारतातून सर्वाधिक पर्यटक असलेल्या श्रीलंकेच्या मंत्रिमंडळाने उद्योगसमूहाच्या बैठकीत याबाबत चर्चा केली. मे महिन्यात भारतातून 5,562 पर्यटक येथे आले आणि या बाबतीत भारत अव्वल स्थानावर राहिला. त्याच वेळी, ब्रिटनमधून 3,723 हून अधिक पर्यटक आले होते. मात्र, मे महिन्यात श्रीलंकेला भेट देणाऱ्या एकूण आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या संख्येत एप्रिलच्या तुलनेत सुमारे 52 टक्के आणि मार्चच्या तुलनेत 72 टक्क्यांनी घट झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Afghanistan Pakistan Border Tension Drone Strike
Sikh Couple Killed In Pakistan Gurdwara Mardan
Times Square shooting during NBA celebration
Thierry Henry Criticism of Cristiano Ronaldo
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com