Russia Ukraine War: 8 जणांचा मृत्यू , 55 जखमी! युक्रेनवर रशियाचे पुन्हा ड्रोनहल्ले; 100 इमारतींचे नुकसान

Russia Ukraine: युक्रेनची राजधानी किव्ह शहरावर रशियाने गुरुवारी मोठ्या प्रमाणात ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले. या हल्ल्यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला, तर ५५ जण जखमी झाले.
Ukraine Attack
Ukraine Russia war X
Published on
Updated on

किव्ह: युक्रेनची राजधानी किव्ह शहरावर रशियाने गुरुवारी मोठ्या प्रमाणात ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले. या हल्ल्यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला, तर ५५ जण जखमी झाले. रशिया-युक्रेन संघर्ष थांबविण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे रशिया आणि युक्रेन परस्परांवर हल्ले करीत असल्याचे चित्र आहे.

युक्रेनचे मंत्री इहोर क्लिमेंको यांनी हल्ल्याची प्राथमिक माहिती दिली. ‘‘मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश होता. ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले,’’ असे ते म्हणाले.

हल्ल्यानंतर युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदीमिर झेलेन्स्की म्हणाले, ‘‘रशियाला वाटाघाटी करण्यामध्ये फारसा रस नसून हल्ला करण्यात रस आहे. त्यांनी यंदा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची निवड केली. जगातील प्रत्येकाकडून आम्हाला प्रतिसादाची अपेक्षा आहे. ज्यांनी शांततेचा आग्रह धरला आहे, ते भूमिका घेण्याऐवजी मौन पाळत आहेत.’’

Ukraine Attack
Russia-Ukraine War: पुतिन यांचे मोठे नुकसान, युक्रेनने कोट्यवधी किमतीची युद्धनौका क्षणात केली उद्ध्वस्त; व्हिडिओ

किव्हमधील प्रशासन अधिकारी तैमुर त्काचेंको म्हणाले, ‘‘रशियाने ड्रोन, आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. किव्हसह २० ठिकाणी त्याचा परिणाम झाला. शहराच्या मध्यभागी असलेल्या एका शॉपिंग मॉलसह जवळजवळ १०० इमारतींना नुकसान झाले आणि खिडक्यांच्या काचांचे मोठे नुकसान झाले. युक्रेनच्या दार्नित्स्की भागात ड्रोन हल्ल्यामुळे पाच मजली निवासी इमारतीला मोठी आग लागली.

Ukraine Attack
America-Russia Tension: 'रशियासोबत अणुयुद्धासाठी अमेरिका तयार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानं खळबळ; जागतिक राजकारण तापलं VIDEO

नातेवाइकांना शोक अनावर

‘हल्ल्यामुळे उध्वस्त झालेल्या भागांमध्ये नागरिक आप्तस्वकीयांचा शोध घेताना दिसले आणि काही मृतदेह बाहेर काढताना दिसले. काळ्या पिशव्यांमध्ये बंद केलेले मृतदेह इमारतीच्या एका बाजूला ठेवण्यात आले होते. मृतांच्या नातेवाइकांना शोक अनावर झाला होता,’ असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. युक्रेनमधील विन्नित्सिया आणि किव्ह भागामध्ये रेल्वेच्या पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, रेल्वेसेवेला त्याचा फटाका बसला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com