Russia-Ukraine War: पुतिन यांचे मोठे नुकसान, युक्रेनने कोट्यवधी किमतीची युद्धनौका क्षणात केली उद्ध्वस्त; व्हिडिओ

Russia Ukraine War Updates: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध दिवसेंदिवस अधिक धोकादायक बनत चालले आहे.
Russia-Ukraine War
Russia-Ukraine WarDainik Gomntak

Russia Ukraine War Updates: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध दिवसेंदिवस अधिक धोकादायक बनत चालले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अलीकडेच पाश्चात्य देशांना इशारा दिला होता की, त्यांनी युक्रेनला युद्धात मदत करत राहिल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील. दरम्यान, युक्रेनने पुतिन यांना या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर मोठा धक्का दिला आहे. युक्रेनच्या सैन्याने ब्लॅक सी मध्ये रशियन युद्धनौकेवर मोठा हल्ला केला. विशेष म्हणजे, युक्रेनने या युद्धनौकेच्या विध्वंसाचा व्हिडिओही सोशल मीडियावर अपलोड केला आहे. युक्रेनने असा दावा केला आहे की, त्यांनी नौदलाच्या ड्रोनच्या मदतीने रशियाचे एक युद्धनौकेवर हल्ला केला.

दरम्यान, युक्रेनियन लष्कराने दावा केला की त्यांनी नौदलाच्या ड्रोनचा वापर करुन ब्लॅक सी मध्ये रशियन ताफ्यातील अत्याधुनिक जहाजावर हल्ला केला, न्यूजवीकने वृत्त दिले. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाच्या मुख्य गुप्तचर संचालनालयाने (एचयूआर) ही बातमी शेअर केली आहे.

Russia-Ukraine War
Russia Ukraine War: रशिया पुन्हा करणार मोठा हल्ला, युक्रेनने सांगितली तारीख; झेलेन्स्की यांनी मित्र देशांकडे मागितली मदत!

दुसरीकडे, युक्रेनियन लष्करी गुप्तचरांनी ब्लॅक सी मध्ये नष्ट केलेले रशियन जहाज 'सर्गेई कोटोव्ह' असल्यचे सांगितले आहे, ज्याची किंमत US$65 दशलक्ष आहे. संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, "आणखी एका रशियन जहाजावर हल्ला केला आहे." रात्रीच्या वेळी @DI_Ukraine "ग्रुप 13" च्या विशेष युनिटने $65 दशलक्ष किमतीच्या ब्लॅक सी मधील रशियन फ्लीट "सर्गेई कोटोव्ह" च्या नवीन गस्ती जहाजावर हल्ला केला. रशियन जहाज ''सर्गेई कोटोव्ह" चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आमच्या योद्ध्यांनी रशियाला चोख प्रत्युत्तर दिले!”

नंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये दावा केला गेला की, युक्रेनियन नौसैनिकांनी "सेर्गेई कोटोव्ह'' ब्लॅक सी मध्ये बुडवले".

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com