Rishi Sunak: ऋषी सुनक पुन्हा लढवणार पंतप्रधानपदाची निवडणूक; ब्रिटनची अर्थव्यवस्था रूळावर आणणार

पक्षात एकजुटीसह देशासाठी काम करण्याची व्यक्त केली इच्छा
Rishi Sunak
Rishi Sunak Dainik Gomantak

Rishi Sunak: भारतीय उद्योजक नारायण मुर्ती यांचे जावई आणि ब्रिटनचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी दावेदार होण्याची घोषणा केली आहे. अर्थव्यवस्था रूळावर आणण्यासाठी, देशासाठी काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.

Rishi Sunak
Xi Jinping: 'जगाला चीनची गरज...', राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर जिनपिंग यांची पहिली प्रतिक्रीया

भारतीय मूळ असलेल्या सुनक यांनी रविवारी औपचारिकरीत्या हुजूर पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी उमेदवारीची घोषणा केली. 42 वर्षीय सुनक पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे आहेत. कारण ब्रिटिश संसदेतील किमान 128 खासदारांचा पाठिंबा त्यांना आहे.

या सगळ्या पार्श्वभुमीवर सुनक यांनी ट्विट केले आहे की, युनायटेड किंग्डम हा एक महान देश आहे. सध्या आपण एका मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहोत. त्यामुळे मी हुजुर पक्षाचा नेता आणि तुमचा पुढचा पंतप्रधान बनण्यासाठी उभा आहे. मला अर्थव्यवस्था पुन्हा रूळांवर आणायची आहे. मला आपल्या पक्षाला पुन्हा एकजूट करायचे आहे. मला आपल्या देशासाठी काम करायचे आहे.

Rishi Sunak
Giorgia Meloni: इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान मेलोनी यांनी घेतली शपथ

सुनक म्हणाले, सध्याची आव्हाने खूप मोठी आहेत. पण योग्य निवड केली तर ही अभूतपुर्व संधी आहे. सर्वात मोठे आव्हान पेलण्याची माझ्याकडे एक योजना आहे. मी 2019 च्या जाहीरनाम्यातील आश्वासने पुर्ण करेन. माझ्या नेतृत्वातील सरकार प्रामाणिक आणि जबाबदार राहील. मी रात्रंदिवस काम करेन. आपल्यासमोरील अडचणींवर मात करण्यासाठी मदत करण्याची संधी मी मागत आहे.

निवडणूक झाल्यास हुजुर पक्ष पराभूत होणार

दरम्यान, एका सर्व्हेनुसार जर ब्रिटनमध्ये सद्यस्थितीत निवडणूक झाली तर हुजूर पक्षाचा पराभव होऊ शकतो, असे चित्र समोर आले आहे. त्यामुळे पक्षाला सध्या निवडणूक नको आहे. वारंवार पंतप्रधान बदलल्याने हुजूर पक्षाची प्रतिमा खराब झाली आहे. तर विरोधी मजुर पक्षाची लोकप्रियता 25 टक्क्यांनी वाढली आहे. तथापि, ब्रिटनमध्ये निवडणुकीस अद्याप दोन वर्षांचा अवधी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com