Giorgia Meloni: इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान मेलोनी यांनी घेतली शपथ

दुसऱ्या महायुद्धानंतर इटलीत पहिल्यांदाच उजव्या विचारसरणीच्या व्यक्तीला पंतप्रधानपद
Giorgia Meloni
Giorgia MeloniDainik Gomantak
Published on
Updated on

Giorgia Meloni: इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून जॉर्जिया मेलोनी यांनी आज, शनिवारी शपथ घेतली. गेल्या महिन्यात झालेल्या निवडणुकीत मेलोनी यांच्या ब्रदर्स ऑफ इटली या पक्षाने विजय मिळवला होता. शनिवारी मेलोनी आणि त्यांच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी पार पडला.

Giorgia Meloni
India's Forex Reserves: भारताचा परदेशी चलन साठा दोन वर्षातील निचांकी पातळीवर

दुसऱ्या महायुद्धानंतर इटलीत पहिल्यांदाच उजव्या विचारसरणीच्या एखाद्या नेत्याला पंतप्रधानपदाची संधी मिळाली आहे. मेलोनी यांच्या आघाडीमध्ये मॅटीओ साल्विनी यांच्या राईट विंग लीग आणि माजी राष्ट्राध्यक्ष सिल्वियो बर्लुस्कोनी यांच्या फोर्झा इटालिया पार्टिचाही समावेश आहे.

गेल्या काही काळामध्ये कडव्या उजव्या विचारसरणीच्या ब्रदर्स ऑफ इटली या पक्षाच्या फायरब्रँड नेत्या म्हणून मेलोनी उदयास आल्या आहेत. रशिया-युक्रेन युद्धाबाबत इटलीच्या भुमिकेवरून संशय निर्माण झाल्यानंतर मेलोनी यांनी तत्काळ झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करत युक्रेनला पाठिंबा दर्शविला होता. 45 वर्षीय मेलोनी यांच्या पक्षाला चार वर्षांपुर्वीच्या निवडणुकीत केवळ 4.13 टक्के मते मिळाली होती. यंदाच्या निवडणुकीत त्यांना 26 टक्के मते मिळाली.

Giorgia Meloni
Xi Jinping: चिनच्या पंतप्रधानांसह पक्षाच्या चार बड्या नेत्यांना जिनपिंग यांनी पदावरून हटवले

युरोपियन युनियनमधून बाहेर पडू शकतो इटली

मेलोनी यांचा पक्ष इटलीचा दिवंगत हुकुमशहा मुसोलिनी याचा समर्थक आहे. स्थलांतरितांना आश्रय न देणे आणि समलैंगिकांना विरोध, समलैंगिकांना अधिकार न देणे हे या पक्षाचे अजेंडे आहेत. दरम्यान, मेलोनी यांच्या विजयाने युरोप चिंतेत आहे. कारण त्या इटलीला युरोपीयन युनियनमधून बाहेर काढू शकतात.

जॉर्जियो मेलोनी यांच्याविषयी...

मेलोनी यांचा जन्म 15 जानेवारी 1977 रोजी झाला असून त्या एक पत्रकार आणि राजकारणी आहेत. दुसऱ्या महायुद्धात इटलीचा हुकुमशहा बेनिटो मुसोलिनी याच्या समर्थकांनी एक आंदोलन सुरू केले होते. त्याला इटालियन सोशल मुव्हमेंट असे नाव दिले होते. 15 व्या वर्षी मेलोनी यांनी यात भाग घेतला होता. मेलोनी यांचे वडील अकाऊंटंट होते. रोम मध्ये जन्मलेल्या मेलोनी यांना इंग्रजी, स्पॅनिश आणि फ्रेंच भाषा येतात. त्यांना एक 16 वर्षांची मुलगीही आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com