Xi Jinping: 'जगाला चीनची गरज...', राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर जिनपिंग यांची पहिली प्रतिक्रीया

CCP General Secretary Xi Jinping: चिनी कम्युनिस्ट पक्षाने पुन्हा एकदा शी जिनपिंग यांना देशाचे प्रमुख केले आहे.
Xi Jinping
Xi JinpingDainik Gomantak

CCP General Secretary Xi Jinping: चिनी कम्युनिस्ट पक्षाने पुन्हा एकदा शी जिनपिंग यांची देशाचे प्रमुख निवड केली आहे. शी जिनपिंग यांची सलग तिसऱ्यांदा कम्युनिस्ट पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तिसर्‍या कार्यकाळाच्या घोषणेनंतर शी जिनपिंग यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

बीजिंगच्या ग्रेट हॉल ऑफ द पीपलमध्ये पत्रकारांशी बोलताना जिनपिंग म्हणाले की, "तुम्ही माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी संपूर्ण पक्षाचे मनापासून आभार मानू इच्छितो."

Xi Jinping
China President Xi Jinping: शी जिनपिंग सलग तिसऱ्यांदा बनले चीनचे राष्ट्राध्यक्ष

शी जिनपिंग (Xi Jinping) पुढे म्हणाले की, "जगाला चीनची गरज आहे. जगाशिवाय चीनचा (China) विकास होऊ शकत नाही आणि जगालाही चीनची गरज आहे. अथक प्रयत्नांनंतर, आम्ही दोन गोष्टी साध्य केल्या आहेत. एक- वेगवान आर्थिक वाढ आणि दोन- दीर्घकालीन सामाजिक स्थिरता.''

माजी अध्यक्षांना बैठकीतून हाकलण्यात आले

याआधी शनिवारी 20 वी काँग्रेस चर्चेत आली जेव्हा माजी राष्ट्रपती हू जिंताओ यांना बैठकीत बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. जिंताहो राष्ट्राध्यक्ष शी यांच्या शेजारी बसले होते. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडीओमध्ये हे स्पष्टपणे दिसत होते की, 'कसे दोन लोक प्रथम जिंताओ यांना काहीतरी बोलतात आणि नंतर त्यांना हाताला धरुन उठवतात. तेथून निघताना जिंताओ शी यांना काहीतरी बोलताना दिसत आहेत.'

Xi Jinping
Xi Jinping: जिनपिंग तिसऱ्यांदा बनणार चीनचे राष्ट्राध्यक्ष

पंतप्रधान ली केकियांग यांच्या बाजूने

शी जिनपिंग यांनी यापूर्वी क्रमांक दोनचे नेते पंतप्रधान ली केकियांग (Prime Minister Li Keqiang) यांची केंद्रीय समितीतून हकालपट्टी केली होती. ली हे जिनपिंग यांचे प्रतिस्पर्धी मानले जातात. अशा प्रकारे शी यांनी आपल्या मार्गातील सर्व अडथळे दूर केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com