Sudan War: 'बलात्कारापासून वाचवण्यासाठी लहान वयातच मुलींना...', सुदान बनला मुलींसाठी नरक

Sudan War: सुदानमध्ये लष्करी गटांमधील संघर्षामुळे, बलात्कार आणि मुलींच्या अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
Crime
Crime Dainik Gomantak
Published on
Updated on

Sudan War: सुदानमध्ये लष्करी गटांमधील संघर्षामुळे, बलात्कार आणि मुलींच्या अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. 12 वर्षांच्या मुलीही याला बळी पडत आहेत. या घटनांपासून आपल्या मुलींना वाचवण्यासाठी पालकांनी मुलींची लहान वयातच लग्ने लावली आहेत.

एका एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. सेव्ह द चिल्ड्रन या संस्थेने एका निवेदनात म्हटले आहे की, "अल्पवयीन मुली दहशतवाद्यांच्या बळी ठरत आहेत, ही चिंताजनक बाब आहे."

दरम्यान, 15 एप्रिल रोजी सुरु झालेल्या युद्धाने सुदानच्या (Sudan) सैन्याला निमलष्करी रॅपिड सपोर्ट फोर्सेसच्या विरोधात उभे केले आहे, जे नागरी शासनाकडे राजकीय संक्रमणाच्या योजनांपासून दूर गेले आहेत. ही लढाई राजधानी खार्तूम आणि दारफुरच्या पश्चिम भागात केंद्रित आहे.

Crime
Sudan Civil War: वेदनादायक! सुदानमधील अनाथाश्रमात 60 चिमुकलांचा मृत्यू

सेव्ह द चिल्ड्रेन सुदानचे संचालक आरिफ नूर म्हणाले...

दुसरीकडे, या युद्धामुळे देशात बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सुदान सरकारच्या एका युनिटच्या अंदाजानुसार, हा आकडा एकूण संख्येच्या फक्त 2 टक्के असू शकतो.

सेव्ह द चिल्ड्रेन सुदानचे संचालक आरिफ नूर यांनी सांगितले की, 12 वर्षांखालील मुलांना त्यांचे लिंग, त्यांची वांशिकता, त्यांची असुरक्षितता यामुळे लक्ष्य केले जात आहे.

ते म्हणाले की, काही पालक आपल्या मुलींना (Girl) पुढील अत्याचारापासून वाचवण्यासाठी लहान वयातच त्यांचे लग्न लावून देतात.

तसेच, मुलींना अनेक दिवस कैद करुन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आणि महिला आणि मुलींवर सामूहिक बलात्कार झाल्याच्या बातम्याही आल्या आहेत.

सुदानमधील आरोग्य सेवा प्रदाते, सामाजिक कार्यकर्ते, समुपदेशक आणि समुदाय-आधारित संरक्षण नेटवर्क या सर्वांनी लिंग-आधारित हिंसाचाराच्या अहवालात लक्षणीय वाढ झाल्याचा इशारा दिला आहे, कारण देशभरात लढाई सुरु आहे, यूएन एजन्सीने एका निवेदनात म्हटले आहे.

Crime
Sudan Crisis: बाजारपेठा अन् बँकांमध्ये लूट सुरु, आतापर्यंत 500 ठार; सुदानचा रक्तरंजित संघर्ष...!

शिवाय, आरएसएफने आपल्या सैनिकांद्वारे केलेल्या हल्ल्याच्या आणि लैंगिक हिंसाचाराच्या आरोपांना थेट संबोधित केले नाही. परंतु असे म्हटले आहे की, अत्याचार करणाऱ्यांना सोडले जाणार नाही. सुदानमधील संघर्षामुळे शेजारच्या देशांमध्ये पळून गेलेल्या सुमारे 700,000 लोकांसह दोन दशलक्षाहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com