Foster Home in Sudan
Foster Home in SudanDainik Gomantak

Sudan Civil War: वेदनादायक! सुदानमधील अनाथाश्रमात 60 चिमुकलांचा मृत्यू

Sudan Foster Home : गृहयुद्धामुळे प्रभावित झालेल्या या देशात सुमारे 60 मुलांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी निम्मी मुले काही दिवसांपूर्वी जन्माला आली होती.

60 children died in an orphanage in Sudan: चूक एकाची आणि शिक्षा दुसऱ्याला. आफ्रिकन देश सुदानमध्ये हेच घडत आहे. गृहयुद्धामुळे प्रभावित झालेल्या या देशात सुमारे 60 मुलांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी निम्मी मुले काही दिवसांपूर्वी जन्माला आली होती.

सरकारी अनाथाश्रमात त्यांचा मृत्यू झाला. हे मृत्यू गेल्या एका महिन्यात झाले आहेत. यातील २६ बालकांचा गेल्या आठवड्यातील शेवटच्या तीन दिवसांत मृत्यू झाला.

वृत्तसंस्था असोसिएटेड प्रेस (एपी) ने सुदानची राजधानी खार्तूम येथे असलेल्या अल-मायकोमा अनाथाश्रमातील डझनहून अधिक डॉक्टर, स्वयंसेवक, आरोग्य अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या.

ज्यावरून कळलं की इथल्या मुलांची अवस्था खूप वाईट आहे. अहवालानुसार, अन्नाचा अभाव, कुपोषण, डिहायड्रेशन, ताप आणि संसर्गामुळे या मुलांचा मृत्यू झाला. औषधे न मिळाल्याने आणि काळजी न घेतल्याने हा प्रकार घडला.

अनाथालयाची अवस्था हादरवणारी!

सुदानमधील एपीच्या पत्रकारांनी अनाथाश्रम आणि रुग्णालये आणि तेथील मुलांची वाईट स्थितीचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. कर्मचारी लहान मुलांचे मृतदेह घेऊन जाताना दिसत आहेत. असे फोटो व्हिडिओ देखील आहेत ज्यात अनेक मुले खोलीत जमिनीवर बसून रडत आहेत. त्यांना बघायला कोणी नाही.

संपूर्ण अनाथाश्रमात एकच डॉक्टर होते. ते म्हणतात की नवजात बालकांना दर तीन तासांनी आहार देणे आवश्यक आहे. परंतु, त्यांची काळजी घेणारे कोणीच नसल्याने कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता आहे.

अशा परिस्थितीत मुलांची काळजी कशी घ्यायची आणि त्यांना वेळेवर जेवण कसे मिळेल? डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, परिस्थिती इतकी वाईट आहे की दररोज दोन, तीन, चार किंवा त्याहूनही अधिक मुले मरत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, 26 मे शुक्रवारी किमान 13 मुलांचा मृत्यू झाला.

Foster Home in Sudan
Squid Game in Singapore : भारतीय व्यक्ती रातोरात लखपती; स्क्विड गेम्समध्ये जिंकले 11.5 लाख रुपये

सुदानमध्ये लष्कर आणि निमलष्करी दलांमध्ये एप्रिलच्या सुरुवातीला युद्ध सुरू झाले होते. काही दिवसांनंतर युद्धविरामही झाला, मात्र त्याचे सातत्याने उल्लंघन होत आहे. युद्धबंदीनंतरही राजधानी खार्तूमवर दररोज रॉकेटने हल्ले केले जातात.

देशात सुरू असलेल्या युद्धात आतापर्यंत 800 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. आणि 13 लाखांहून अधिक लोकांना विस्थापित व्हावे लागले आहे.

Foster Home in Sudan
India-China Crisis : Line of Control वर चीनच्या मोठ्या हालचाली; सॅटेलाइट इमेजद्वारे ड्रॅगनचे कारणामे उघड

सुदानमधील सध्याच्या युद्धाचे मूळ म्हणजे 2019 पासून देशात निर्माण झालेली नागरी अशांतता आहे, जेव्हा राष्ट्राध्यक्ष ओमर अल-बशीर यांची दीर्घकालीन हुकूमशाही कोसळली आणि संक्रमणकालीन लष्करी सैन्याने सत्तेसाठी स्पर्धा सुरू केली. तेव्हापासून सुदानमध्ये सत्तेसाठी स्पर्धा सुरू असून याचे परिणाम नागरिकांना भोगावे लागत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com