Vladimir Putin यांची तब्येत आणखी खालावली? घरात पडल्याने गंभीर दुखापत झाल्याची चर्चा

पुतीन यांच्या जवळच्या लोकांनी असे म्हटले आहे की, त्यांची तब्येत सातत्याने खालावत आहे, त्यामुळेच ते घराबाहेर पडणे कमी करत आहेत.
Vladimir Putin
Vladimir Putin Dainik Gomantak
Published on
Updated on

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन कर्करोगाशी झुंज देत असल्याच्या बातम्या सध्या समोर येत असून त्यांना पोट आणि आतड्यासंबंधी गंभीर समस्या निर्माण झाल्याचे समजत आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन त्यांच्या मॉस्को निवासस्थानाच्या पाचव्या पायऱ्यावरून पडल्याने त्यांच्या मणक्याला मार लागल्याचे व्ह्यूयॉर्क टेलिग्राम चॅनेलने असे म्हटले आहे

काही अहवालांमध्ये पुतीन यांच्या जवळच्या लोकांनी असे म्हटले आहे की, "पुतिन यांना ब्लड कॅन्सरने ग्रासले आहे. त्यांची तब्येत सातत्याने खालावत आहे, त्यामुळेच ते घराबाहेर पडणे कमी करत आहेत. सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहणे ते टाळत आहेत. "मात्र, आतापर्यंत पुतिन यांच्याबाबत अनेक घटना घडल्या आहेत. व्लादिमीर पुतिन यांच्या प्रकृतीबाबत किंवा आजाराबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही". या सर्व बातम्या अनुमान आणि सूत्रांवर आधारित आहेत. याआधीही पुतिन यांच्या प्रकृतीबाबत अफवा पसरल्या होत्या.

Vladimir Putin
Taliban: भारत पुन्हा अफगानिस्तानात....

ब्रिटनच्या एका वृत्तपत्राने असाही दावा केला आहे की, गेल्या महिन्यात क्यूबाचे राष्ट्राध्यक्ष मिगुएल डायझ कॅनाल यांच्यासोबत झालेल्या भेटीदरम्यान पुतिन खूप अस्वस्थ वाटत होते. यावेळी त्यांचे हातही थरथरत होते. कॅनाल यांच्यासोबत त्यांना नीट भेटही घेता आली नाही.

Vladimir Putin
India-Nepal Border Dispute: उत्तराखंडात भारत-नेपाल सीमेवर तणाव; भारतीय मजुरांवर दगडफेक

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी 24 फेब्रुवारीला युक्रेनवर लष्करी कारवाई सुरू केली. यामध्ये पहिल्या दिवशी सैनिक आणि सामान्य नागरिक मिळून 137 जणांचा जीव गेल्यांचं युक्रेनने सांगितले. या कारवाईत दोन्ही देशांचं प्रचंड नुकसान होत असलं तरी रशिया माघार घ्यायला तयार नव्हता. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून त्यांचा त्रास कमी होताना दिसत नाही, अशी आता बोललं जातंय . आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व निर्बंध, मोठ्या कंपन्यांचे काम थांबणे आणि युद्ध अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने जास्त ओढले जाणे, या सर्व नुकसानकारक गोष्टी दरम्यानच्या काळात घडल्या

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com