Taliban: भारत पुन्हा अफगानिस्तानात....

Taliban: अफगानिस्तानमध्ये तालिबान आल्यानंतर पाकिस्तानसाठी ही सुवर्णसंधी असल्यासारखे वाटले होते.
Indian Flag
Indian FlagDainik Gomantak
Published on
Updated on

Taliban: कोणत्याही देशावर आंतराराष्ट्रीय पातळीवर घडणाऱ्या घडामोडींचा ,राजकारणाचा परिणाम होत असतो. तालिबानने अफगानिस्तानचा ताबा घेतल्यावर संपुर्ण जगात त्याचे पडसाद उमटलेले दिसुन येतात. अफगानिस्तानमध्ये तालिबान आल्यानंतर पाकिस्तानसाठी ही सुवर्णसंधी असल्यासारखे वाटले होते. यासाठीच पाकिस्तानने तालिबानला मोठ्या प्रमाणात मदत केली होती.

मात्र, तालीबानने अफगानिस्तानवर ताबा घेतल्यानंतर वर्षभरात अफगानिस्तानमधील परिस्थिती बिकट झाली आहे. तालीबानने अफगानिस्तान आणि पाकिस्तानमध्ये असलेली डुरंड सीमारेषा मानण्यास नकार दिला आहे. त्याबरोबरच, एकीकडे अफगानिस्तान सीमेवर पाकिस्तान आणि तालिबान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती आहे. तर दुसरीकडे,काबुलमध्ये पाकिस्तानच्या राजदुताला मारण्याचा प्रयत्न केला आहे.

Indian Flag
Navy Day: 'पीव्ही सिंधू नौदलासाठी करते नारी शक्तीचे प्रतिनिधित्व', ऍडमिरलांकडून कौतुक

यादरम्यान ,भारत ( India ) आणि अफगानिस्तानमधील संबंध मात्र सुधारताना दिसत आहेत. भारतानंतर जपाननेदेखील अफगानिस्तानमध्ये दुतावास खोलण्याचा निर्णय घेतला आहे . भारत अफगानिस्तानमध्ये परत एकदा विकास योजना सुरु करत आहे. टीटीपी आतंकवादी संघटनेचे 4000 आतंकवादी सक्रीय आहेत. टीटीपी आणि तालीबान यांच्यातला करारही संपुष्टात आला आहे. भारताची अफगानिस्तानमधील उपस्थिती ही संवेदनशील बाब आहे. तालीबानचे गृहमंत्री सिराजुद्दीन हक्‍कानी यांनीसुद्धा भारताच्या तत्वांविरोधी कारवाई करु असे म्हटले आहे. भारताने अफगानिस्तानमध्ये गहू पाठवले आहेत. भारत अफगानिस्तानच्या विकासास हातभार लावण्यास मदत करेल. जगभरात भारताचे हे पाऊल धाडसाचे मानले जात आहे. भारताने विचारपुर्वक निर्णय घ्यावा असे बोलले जाते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com