Nepal-India Border Dispute: उत्तराखंडातील पित्तोरगड येथे भारत-नेपाळ सीमेवर रविवारी तणाव निर्माण झाला. रविवारी सायंकाळी येथे भारतीय मजुरांवर नेपाळच्या बाजूने दगडफेक करण्यात आली. अचानक झालेल्या या प्रकाराने येथे गोंधळ माजला. विशेष म्हणजे नेपाळचे सुरक्षारक्षकांनी यावर काहीही कारवाई केली नाही, ते घडला प्रकार पाहत राहिले.
धारचुला भागात ही घटना घडली. धारचुला भागातील काली नदीवर भारताकडून तटबंदी घालण्याचे काम सुरू आहे. त्याला काही नेपाळी नागरिकांचा विरोध आहे. हा बांध बांधतानाच्या कामात यापुर्वीही नेपाळकडून वारंवार दगडफेकीचे प्रकार घडले आहेत.
धारचुला हा नेपाळ आणि चीन यांच्यातील सीमावर्ती भाग आहे. नेपाळची सीमा धारचुला येथून सुरू होते. धारचुला येथे काली नदीच्या एका काठावर नेपाळ आहे तर दुसऱ्या काठावर नेपाळ आहे. काली नदीच्या आजुबाजूला शेकडो गावे आहेत. या गावांमध्ये येण्याजाण्यासाठी अनेक सस्पेन्शन ब्रिज बनवले गेले आङेत. भारत नेपाळ सीमेवर एसएसबीला तैनातही केले आहे.
भारत स्वतःच्या मालकीच्या भागात तटबंदी बांधत आहे. तरीदेखील नेपाळकडून या कामाला वारंवार विरोध केला जात आहे. दगडफेकीचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे भारताच्या हद्दीत या प्रकारांबाबत नाराजी आहे. भारताच्या तटबंदीमुळे नेपाळला नदीच्या पाण्याचा धोका होईल, असे नेपाळमधील लोकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, यापुर्वी 2020 मध्ये नेपाळने एक नकाशा जारी करून कालापानी, लिंपियाधुरा आणि लिपुलेख हे भारताचे भाग नेपाळमध्ये दाखवले होते. हे भाग उत्तराखंड राज्याचा भाग आहेत. त्यामुळे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 8 मे 2020 रोजी एका विशेष कार्यक्रमातून धारचुला ते लिपुलेख रस्तेकामाचे उद्घाटन केले होते. त्यालाही नेपाळने विरोध दर्शविला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.