Putin Threatened Johnson: तुमच्यावर मिसाईल अ‍ॅटॅक करायला फक्त 1 मिनिट लागेल...

पुतीन यांनी दिली होती धमकी; ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरीस जॉनसन यांचा दावा
Putin Threatened Johnson
Putin Threatened JohnsonDainik Gomantak
Published on
Updated on

Putin Threatened Johnson: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती, असा दावा ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी केला आहे. बोरिस जॉन्सन हे 2019 ते ऑक्टोबर 2022 पर्यंत ब्रिटनचे पंतप्रधान होते. विशेष म्हणजे, पदावर असतानाच त्यांना ही धमकी मिळाली होती. हा खुलासा बोरिस जॉन्सन यांनी बीबीसीच्या एका नवीन डॉक्युमेंटरीमध्ये केला आहे.

Putin Threatened Johnson
Sweden Girl Marriage: स्वीडनच्या मुलीची वरात थेट उत्तरप्रदेशच्या गावात! फेसबूकवरून जुळले प्रेम...

बोरिस जॉन्सन यांनी बीबीसी डॉक्युमेंटरीमध्ये युक्रेन-रशिया युद्ध आणि पुतिन यांच्या धमकीविषयी भाष्य केले आहे. मिसाईल अ‍ॅटॅकला केवळ एक मिनिट लागेल, असे पुतीन म्हटल्याचा दावा जॉनसन यांनी केला आहे.

फेब्रुवारी 2022 मध्ये रशियन हल्ल्यापूर्वी, बोरिस यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली होती. यानंतर पुतिन यांनी बोरिस यांना फोन केला होता. या माहितीपटात बोरिस यांनी पुतीन यांच्याशी झालेल्या संभाषणाचा उल्लेख केला आहे.

बोरिस म्हणाले की, 24 फेब्रुवारी 2022 रोजी युक्रेनवर हल्ला होण्यापूर्वी मी पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. तेव्हा पुतिन यांनी धमकी दिली. बोरिस, मला तुझे नुकसान करायचे नाही, पण क्षेपणास्त्र हल्ला करायला मला एक फक्त मिनिट लागेल.

Putin Threatened Johnson
Khalistani Attacks Indians: मेलबर्नमध्ये तिरंगा घेतलेल्या भारतीयांवर खलिस्तानवाद्यांचा हल्ला

बोरिस जॉन्सन यांनी डॉक्युमेंटरीमध्ये म्हटले आहे की, युक्रेनवर हल्ला करण्यापूर्वी मी पुतीन यांना समजवण्याचा प्रयत्न केला होता. युक्रेन नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO) मध्ये सामील होण्याची शक्यता नाही.

मी पुतीन यांना खात्री देण्याबरोबरच त्यांना इशाराही दिला होता. मी म्हणालो की युक्रेनवर आक्रमण केल्याने तुमचा थेट सामना नाटोशी होईल. या हल्ल्यामुळे तुम्ही स्वतःला नाटोपासून दूर ठेवू शकणार नाही. पण पुतिन माझे म्हणणे गांभीर्याने ऐकत नव्हते.

पुतिन अगदी आरामात बोलत होते, पण ते काही समजून घ्यायला तयार नव्हते. ते माझे प्रयत्न आणि माझे म्हणणे टाळत आहेत असे वाटत होते.

दरम्यान, बोरीस जॉनसन यांनी रशियाने हल्ला केला तर यूके सरकार युक्रेनला मदत करेल, असेही म्हटले होते. त्यांनी रशियावर अनेक निर्बंधही लादले. त्यामुळे रशियानेही जॉनसन आणि परराष्ट्र सचिव लिझ ट्रस यांच्यासह 10 ब्रिटीश मुत्सद्दींवर बंदी घातली होती. दरम्यान, रशियाच्या हल्ल्यानंतर जॉनसन यांनी तीन वेळा युक्रेनला भेट दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com