Khalistani Attacks Indians: मेलबर्नमध्ये तिरंगा घेतलेल्या भारतीयांवर खलिस्तानवाद्यांचा हल्ला

10 जण ताब्यात; 15 दिवसांत 3 हिंदू मंदिरांची तोडफोड
Khalistani Attacks Indians In Melbourne
Khalistani Attacks Indians In Melbourne Dainik Gomantak

Khalistani Attacks Indians: ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये तिरंगा असलेल्या भारतीयांवर खलिस्तान समर्थकांनी हल्ला केला. या घटनेत सहा जण जखमी झाले असून पोलिसांनी 10 जणांना ताब्यात घेतले आहे. मेलबर्नमधील तीन हिंदू मंदिरांची गेल्या 15 दिवसांत भारतविरोधी आणि खलिस्तान समर्थक घोषणांनी तोडफोड करण्यात आल्यानंतर या घटनेने चिंतेमध्ये भर पडली आहे.

Khalistani Attacks Indians In Melbourne
Adani Vs Hindenburg: हिंडेनबर्ग रिपोर्ट म्हणजे भारतावरील हल्ला, सर्व आरोप खोटे असल्याचा अदानी ग्रुपचा दावा

भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये खलिस्तानचा झेंडा हातात घेतलेले अनेक लोक तिरंगा हातात घेतलेल्या भारतीयांवर हल्ले करत असल्याचे दिसते. खलिस्तानी समर्थकांच्या हातात लाठ्याही दिसत आहेत.

शिख फॉर जस्टिस (SFJ) या भारतातील प्रतिबंधित संघटनेने मेलबर्नच्या फेडरेशन स्क्वेअरवर कथित सार्वमत आयोजित केले होते. येथे खलिस्तान समर्थक मोठ्या संख्येने ध्वज घेऊन घोषणा देत होते. दरम्यान, भारत माता की जय आणि खलिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत 25-30 तरुणांच्या गटाने फेडरेशन स्क्वेअरकडे मोर्चा वळवला.

या तरुणांनी हातात भारतीय राष्ट्रध्वज तिरंगा घेतला होता. त्यांना पाहताच खलिस्तान समर्थक त्यांच्यावर धाऊन गेले. भारतविरोधी घोषणा देत हल्लेखोरांनी तरुणांवर लाठीहल्ला केला.

दरम्यान, येथे खलिस्तानी प्रचाराला पाठिंबा देण्याच्या बदल्यात तरुणांना कायमस्वरूपी नागरिकत्वाचे आमिष दाखवले जात आहे. या लालसेपोटी काही तरुणही त्यांच्यात सामील होत आहेत.

Khalistani Attacks Indians In Melbourne
Google CEO Sundar Pichai: 12000 कर्मचाऱ्याना नारळ दिल्यानंतर आता गुगलचा मोठा निर्णय, पिचाई उचलणार मोठे पाऊल

वास्तविक, ऑस्ट्रेलियामध्ये ओव्हरस्टेयर्सची संख्या लक्षणीय आहे. हे लोक आपले हित साधण्यासाठी भारतविरोधी कारवायांमध्ये सामील होत आहेत. शेतकरी आंदोलनाच्या काळातही ऑस्ट्रेलियात भारतविरोधी कारवाया झाल्या.

कॅनडा आणि अमेरिकेनंतर ऑस्ट्रेलियातही गेल्या पाच वर्षांत खलिस्तानी समर्थक वाढत आहेत. मेलबर्नमध्ये रविवारी झालेल्या हिंसाचारात बेकायदेशीर स्थलांतरितांचाही सहभाग असण्याची भीती आहे. याबाबत पोलिसांना यापूर्वीही सांगण्यात आले होते, मात्र कारवाई झाली नाही.

ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील स्वामीनारायण मंदिरावर 11 जानेवारी रोजी खलिस्तान समर्थकांनी हल्ला केला होता. येथे अज्ञात लोकांनी भिंतींचे नुकसान करून भारतविरोधी गोष्टी लिहिल्या. इतकेच नाही तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातही मजकूर लिहिण्यात आला होता. भिंतींवर एका दहशतवाद्याचे नावही लिहिले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com