''पाकिस्तानींना शिक्षा'', पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना चोर म्हणणाऱ्यांना अटक

पंतप्रधान शेहबाज शरीफ (Prime Minister Shehbaz Sharif) आणि त्यांच्या शिष्टमंडळाविरुद्ध अपमानास्पद घोषणा दिल्याबद्दल सौदी अधिकाऱ्यांनी शुक्रवारी काही पाकिस्तानी यात्रेकरुंना अटक केली.
Prime Minister Shehbaz Sharif
Prime Minister Shehbaz SharifDainik Gomantak
Published on
Updated on

मदिना या पवित्र शहरातील मस्जिद-ए-नबवीमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ (Shehbaz Sharif) आणि त्यांच्या शिष्टमंडळाविरुद्ध अपमानास्पद घोषणा दिल्याबद्दल सौदी अधिकाऱ्यांनी शुक्रवारी काही पाकिस्तानी यात्रेकरुंना अटक केली. इस्लामाबादमधील सौदी अरेबियाच्या दूतावासाने शुक्रवारी याची पुष्टी केली. पाकिस्तानचे (Pakistan) वृत्तपत्र डॉनने वृत्त दिले आहे की, सौदी दूतावासाच्या मीडिया डायरेक्टरच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांना पाहताच आंदोलकांनी चोर चोरच्या घोषणा दिल्या. नियमांचे उल्लंघन आणि पवित्र मशिदीच्या पावित्र्याचा अपमान केल्याप्रकरणी आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे. (Protesters have been arrested for making insulting remarks against Pakistan's Prime Minister Shahbaz Sharif and his delegation)

Prime Minister Shehbaz Sharif
शिष्टमंडळाविरोधात 'चोर' म्हणून घोषणा दिल्याने पाकिस्तानच्या माजी उपसभापतींवर इस्लामाबादमध्ये हल्ला

दरम्यान, पाकिस्तानचे नवनियुक्त पंतप्रधान शरीफ एका शिष्टमंडळासह सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia) तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. शिष्टमंडळात बिलावल भुट्टो-झरदारी यांचाही समावेश आहे. पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर शरीफ यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे. गुरुवारी शिष्टमंडळाला पवित्र मशिदीत निदर्शने आणि घोषणाबाजीला सामोरे जावे लागले. त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पंतप्रधान शरीफ आणि त्यांचा मुलगा हमजा यांच्यावर मनी लाँड्रिंगचे (Money laundering) आरोप आहेत. तर दुसरीकडे, त्यांनी आपल्यावरील खटले राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप केला आहे.

मंत्री शाहजैन बुगती यांचे केस ओढले

दुसर्‍या व्हिडिओमध्ये, यात्रेकरु पाकिस्तानी मंत्री मरियम औरंगजेब आणि शाहझैन बुगती यांच्या विरोधात अपमानास्पद घोषणाबाजी करताना दिसले. मंत्र्यांसोबत सौदी अरेबियाचे सुरक्षा कर्मचारी उपस्थित होते. त्यातच मागून एक यात्रेकरु बुगती यांचे केस ओढताना दिसला. यात्रेकरुंच्या त्रासाला उत्तर देताना, मरियम औरंगजेब यांनी एका व्हिडिओ संदेशात म्हटले की, ''हे कृत्य एका निवडक गटाने केले आहे, तर बहुतेक पाकिस्तानी पवित्र मशिदीच्या पावित्र्याचा आदर करतात. या पवित्र भूमीचा वापर मला राजकीय हेतूसाठी करायचा नाही. त्यामुळे या घटनेला जबाबदार असलेल्या व्यक्तीचे नाव मला सांगायचे नाही.''

पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्ला यांनी सांगितले की, ''आमचे मंत्रालय सौदी अरेबिया सरकारला पाकिस्तानी यात्रेकरुंवर योग्य कारवाई करण्याची विनंती करेल.'' पाकिस्तान उलेमा कौन्सिलचे अध्यक्ष ताहिर महमूद अशरफी यांनी या घटनेचा निषेध केला असून मुस्लिमांनी रमजानच्या पवित्र दिवशी गलिच्छ घोषणाबाजी आणि आरोप करण्याऐवजी मस्जिद-ए-नबवीमध्ये आपले डोके टेकवले पाहिजे, असे म्हटले आहे. याशिवाय पाकिस्तानातील अनेक मंत्री आणि प्रमुख व्यक्तींनीही या घटनेचा निषेध केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com