पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (shehbaz sharif) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला सौदी अरेबियामध्ये नाराजीचा सामना करावा लागला. येथील एका मशिदीत प्रवेश करताच भाविकांनी पक्षाच्या संदर्भात ‘चोर-चोर’अशा घोषणा दिल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर पोलिसांनी काही लोकांना अटक केल्याची माहिती मिळाली आहे. पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदाच शरीफ सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia) दौऱ्यावर गेले आहेत.
एएनआय न्यूज एजन्सीनुसार, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लोक मस्जिद-ए-नवाबीमध्ये जाणाऱ्या शिष्टमंडळाचा निषेध करत आहेत. यासोबतच त्यांना पाहून 'चोर-चोर'च्या घोषणाही दिल्या जात आहेत. व्हिडिओमध्ये माहिती मंत्री मरियम औरंगजेब आणि नॅशनल असेंब्ली सदस्य शाहजैन बुगती दिसत आहेत.
एजन्सीने पाकिस्तानी वृत्तपत्राच्या हवाल्याने म्हटले आहे की, मंत्री औरंगजेब यांनी या घटनेबाबत नाव न घेता इम्रान खान यांना लक्ष्य केले. 'मला या पवित्र भूमीवर या व्यक्तीचे नाव घ्यायचे नाही, कारण मला या भूमीचा राजकारणासाठी वापर करायचा नाही. पण त्यांनी (पाकिस्तानने) समाजाला उद्ध्वस्त केले आहे, असे मरियम म्हणाल्या. यावेळी पंतप्रधान शरीफ यांच्यासोबत अनेक नेते आणि अधिकारी उपस्थित होते.
या भेटीदरम्यान शरीफ सौदी अरेबियाकडून 3.2 अब्ज डॉलर्सचे अतिरिक्त पॅकेज मागत आहेत. सौदी अरेबियाने कर्जबाजारी देशाला आधीच 3 अब्ज डॉलर्स ठेवी दिल्या आहेत. अंदाजानुसार, भविष्यात येणारे आर्थिक संकट टाळण्यासाठी आणि परकीय चलनाच्या साठ्याची आणखी घट टाळण्यासाठी पाकिस्तानला अब्जावधी डॉलर्सची गरज आहे. शरीफ यांनी 11 एप्रिल रोजी पाकिस्तानचे 23 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.