गुगल (Google) अँड्रॉइड युजरच्या (Android User) प्रायव्हसीसंबंधीत समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचं दरवेळी सांगितलं जातं. तर दुसरीकडे आता एका रिसर्चमध्ये गुगलबाबत एक वेगळाच दावा करण्यात आला आहे. गुगल Google Dialer and Messages सारख्या Apps वरुन युजर्सच्या परवानगीशिवाय त्यांचा डेटा गोळा असल्याचा दावा रिसर्चमध्ये करण्यात आला आहे. (Google stealing your chats and messages through these apps big revelation from research)
हे दोन Apps अँड्रॉइड फोनवरती प्री-इन्स्टॉल केलेले आहेत. “What Data Do The Google Dialer and Messages Apps on Android Send to Google?” अशा टायटलसह या रिसर्चमध्ये गुगल डेटा मिळवत असल्याचा दावा करण्यात आला आहे. (Google stealing users data news)
या रिसर्चमध्ये हे Apps युजरच्या कोणत्याही परवानगीशिवाय त्यांचा डेटा गुगलला पाठवत असल्याचं म्हटलं गेलं आहे. Trinity College मधील Douglas Leith या एका कंप्यूटर सायन्स प्रोफेसरने याचा रिसर्च केला आहे.
गुगलने डेटा हॅश मेसेज स्वरुपात गोळा केला तरी त्या हॅश कंटेंटमधील मेसेज जाणून घेतला जातो असंही Leith यांनी यावेळी सांगितलं. त्याशिवाय गुगलने Google Dialer and Messages Apps साठीचा डेटा गोळा करण्यासाठी प्रायव्हसी पॉलिसी देणं अतिशय शांतपणे टाळलं असल्याचंही त्यांनी यामध्ये नमूद केलं आहे. अशाप्रकारे प्रायव्हसी पॉलिसी देणं टाळणं हे नियमांचं उल्लंघन असल्याचंही ते म्हणाले आहेत.
Douglas Leith यांनी मागील वर्षी हा अभ्यास केला, आणि हे रिसर्च केलं होतं. त्यानंतर त्यांनी या Apps बाबत आढळलेल्या प्रायव्हसीसंबंधी त्रुटी किंवा इतर बाबींची माहिती Googleला दिली आहे. प्रायव्हसीबाबतच्या अशा त्रुटी टाळण्यासाठी काही महत्त्वाचे बदल करण्याचंही त्यांनी गुगलला यावेळी सुचवलं होतं. तसंच गुगलला Google Dialer and Messages Apps वरुन डेटा मिळवण्याची कारणं स्पष्ट करण्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
तर Google ने यावर स्पष्टीकरणही दिलं आहे. या स्पष्टीकरणात गुगलने हॅश मेसेज सिक्वेन्सिंग बग शोधण्यासाठी गोळा केले जात असल्याचं म्हटलं. तर कॉल लॉग्स RCS या मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर पाठवण्यात येणाऱ्या OTP चं ऑटोमेटिक डिटेक्शन सुधारण्यासाठी घेतले जात असल्याचंही गुगलने स्पष्ट केलं होतं.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.