Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन यांच्यात सुरु असलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. यातच आता, युक्रेनचे राष्ट्रपती झेलन्स्की यांनी नवा फर्मान काढला आहे. या फर्मानाने एका झटक्यात युक्रेनच्या या सुंदर मुलींचे आयुष्य बदलून गेले आहे.
आता फॅशनेबल कपड्यांऐवजी त्यांना गणवेश घालावा लागणार आहे. मेकअप ऐवजी मिलिटरी गॅजेट्स घालणे ही सक्ती असेल.
या युक्रेनियन मुलींनीही त्यांच्या करिअरबाबत अनेक स्वप्ने पाहिले असतील, पण आता त्यांना युद्धाच्या मैदानात उतरावे लागणार आहे. रशियाविरुद्धच्या या लढ्यात त्यांना सहभागी व्हावे लागेल, असे नव्या फर्मानामध्ये म्हटले आहे.
खरे तर, सर्व मुलींना सैन्यात भरती व्हावे लागेल, असा आदेश झेलेन्स्की सरकारने जारी केला आहे. केवळ 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना सूट देण्यात आली आहे.
सर्व महिला डॉक्टर (Doctor) आणि परिचारिकांना युद्धात उतरावे लागेल. म्हणजे महिलांना युद्ध प्रशिक्षण घेऊन आघाडीवर जावे लागेल.
युक्रेन (Ukraine) सरकार कोणी विद्यार्थी, गृहिणी किंवा शिक्षिका किंवा इतर काही आहे की नाही याचा विचार करणार नाही. जर तो तंदुरुस्त असेल आणि कोणताही गंभीर आजार नसेल तर त्याला लष्कराच्या गरजेनुसार काम करावे लागेल.
आता बर्फ पडणार असल्याने सरकारने हा आदेश जारी केला आहे. बर्फवृष्टीमुळे युद्धाचा वेग कमी होतो. समोरुन सैनिकांना परत बोलावले जाते. पण युद्ध पूर्णपणे थांबत नाही.
हिमवर्षाव दरम्यान पुरुष सैनिक विश्रांती घेतील. सैनिकांना कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी दिली जाईल आणि किरकोळ जखमी सैनिकांवर उपचार केले जातील. पुरुष सैनिकांना विश्रांती मिळावी यासाठी आतापासूनच महिलांची भरती सुरु करण्यात आली आहे.
झेलेन्स्की हे चांगलेच जाणतात की, देशातील बहुतांश महिलांना सैन्यात भरती व्हायचे नाही. त्यामुळेच हा आदेश संपूर्ण देशात लागू करण्यात आला आहे. म्हणजेच 18 वर्षांवरील आणि 60 पेक्षा कमी वयाच्या सर्व महिलांना युद्ध लढावे लागेल.
महिला लढू शकत नाहीत, त्यांचा इतर लष्करी कारणांसाठी वापर केला जाईल. लेडी डॉक्टर आणि परिचारिकांना लष्कराच्या रुग्णालयात पाठवले जाईल.
महिलांना आर्मी किचनमध्येही पाठवले जाईल. नाटो देशांतून येणाऱ्या शस्त्रास्त्रांची काळजी घेणे आणि ते युद्धक्षेत्रात पोहोचवण्याची जबाबदारीही महिलांना दिली जाऊ शकते.
युक्रेनच्या सैन्यात नुकत्याच सामील झालेल्या महिलांना युद्धासाठी प्रशिक्षण देणे कठीण होईल. त्यामुळे महिला लष्कराच्या इतर कामांमध्ये गुंतल्या जातील आणि पूर्वी अस्तित्वात असलेल्या लेडी ब्रिगेडला युद्धभूमीवर पाठवले जाईल.
आता युक्रेनमध्ये सैन्यात महिलांची संख्या 60 हजार आहे.
5 हजार जवानांना आघाडीवर पाठवण्यात आले आहे.
सध्या 20 हजार महिलांनी लष्कराचे प्रशिक्षण घेतले आहे.
योजनेनुसार, थंडीमध्ये युक्रेनच्या नियमित सैनिकांना विश्रांती दिली जाईल आणि युद्धाची कमान महिलांच्या हातात दिली जाईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.