Russia Ukraine War: झेलेन्स्कींची मोठी घोषणा, युक्रेनला मिळणार 42 F-16 लढाऊ विमाने, आता...

Russia Ukraine War News: रशिया-युक्रेन यांच्यात सुरु असलेलं युद्ध थांबण्याचं काही नाव घेत नाहीये.
F-16
F-16 Dainik Gomantak
Published on
Updated on

Russia Ukraine War News: रशिया-युक्रेन यांच्यात सुरु असलेलं युद्ध थांबण्याचं काही नाव घेत नाहीये. यातच आता, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी एक मोठी घोषणा केली आहे.

वैमानिकांच्या प्रशिक्षणानंतर युक्रेनला 42 एफ-16 लढाऊ विमाने मिळतील, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. "F-16, एक निर्णायक करार... धन्यवाद, नेदरलँड,"

Zelensky यांनी रविवारी डच पंतप्रधान मार्क रुट्टे यांच्याशी आइंडहोव्हन येथील डच लष्करी तळावर भेट घेतल्यानंतर एका टेलिग्राम पोस्टमध्ये लिहिले, शिन्हुआ वृत्तसंस्थेने वृत्त दिले.

याआधी शनिवारी युक्रेनचे (Ukraine) संरक्षण मंत्री ओलेक्सी रेझनिकोव्ह यांनी सांगितले की, युक्रेनच्या पायलट आणि सपोर्ट स्टाफसाठी F-16 चे प्रशिक्षण सुरु झाले आहे. ते पुढे म्हणाले की, प्रशिक्षण कार्यक्रम किमान सहा महिने चालेल.

F-16
Russia Ukraine War: युक्रेनमध्ये चर्चला निघालेल्या नागरिकांवर रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला; 7 मृत्यू, 90 जखमी

झेलेन्स्की बर्‍याच दिवसांपासून F-16 मागत होते

युक्रेनियन वायुसेनेला बळकट करण्यासाठी, झेलेन्स्की अनेक महिन्यांपासून मित्र राष्ट्रांना F-16 प्रदान करण्याची विनंती करत होते. अमेरिकेने (America) नुकतीच नेदरलँड्स आणि डेन्मार्कला युक्रेनला अमेरिकन बनावटीची लढाऊ विमाने देण्यास मान्यता दिली. झेलेन्स्की यांनी रविवारी ही विमाने घेण्यासाठी दोन्ही देशांचा दौरा केला.

युक्रेन राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की म्हणाले की, "F-16 नक्कीच सैनिक आणि नागरिकांना नवीन ऊर्जा, आत्मविश्वास आणि प्रेरणा देईल.''

F-16
Russia-Ukraine War: युद्ध सुरु असतानाच झेलेंस्कीनी 112 जणांना केले बडतर्फ; सैन्याच्या त्या चूकीसाठी...

युक्रेनचा आत्मविश्वास वाढला

दुसरीकडे, क्रेमलिनच्या सैन्याला प्रत्युत्तर देण्यासाठी F-16 ची युक्रेनला खूप मोठी मदत होणार आहे. नेदरलँड्स आणि डेन्मार्कने शुक्रवारी सांगितले की, अमेरिकेने त्यांना युक्रेनला यूएस-निर्मित F-16 लढाऊ विमाने देण्यासाठी अधिकृत मान्यता दिली आहे.

युक्रेन जुन्या विमानांवर अवलंबून होता

युक्रेनला युद्धात अत्तापर्यंत रशियन बनावटीच्या मिग-29 आणि सुखोई लढाऊ विमानांसारख्या जुन्या विमानांवर अवलंबून रहावे लागले. परंतु आता F-16 मध्ये नवीन तंत्रज्ञान आणि अचूक फायरपॉवर आहे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार, ते अधिक उपयुक्त आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Trump Signs Sanctioning Russia & Iran Act 2026
AI Chatbot False Intelligence Report US China War
US Iran War End Donald Trump Peace Deal Statement
US Iran War Pentagon Audit Report 2026
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com