'मी कोणालाही घाबरत नाही', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला पोप लिओ यांचं प्रत्युत्तर; शांततेचा संदेश सुरुच ठेवणार असल्याचं केलं स्पष्ट

Pope Leo XIV Response to Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या जहरी टीकेला आता ख्रिस्ती धर्मीयांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप लिओ चौदावे यांनी चोख प्रत्युत्तर दिले.
Pope Leo XIV Response to Donald Trump
Pope Leo XIV Dainik Gomantak
Published on
Updated on

Pope Leo XIV Response to Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या जहरी टीकेला आता ख्रिस्ती धर्मीयांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप लिओ चौदावे यांनी चोख प्रत्युत्तर दिले. इराणमध्ये सुरु असलेल्या अमेरिका-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी पोप यांच्यावर निशाणा साधला होता. या टीकेला उत्तर देताना पोप लिओ यांनी स्पष्ट केले की, शांतता आणि सामंजस्यासाठी व्हॅटिकनने केलेले आवाहन हे पूर्णपणे 'गॉस्पेल'वर (बायबलमधील शुभवर्तमान) आधारित असून ट्रम्प प्रशासनाच्या कोणत्याही धमक्यांना किंवा टीकेला ते घाबरत नाहीत. अल्जीरियाच्या दौऱ्यावर जात असताना विमानात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली.

पोप लिओ म्हणाले की, त्यांच्या शांततेच्या संदेशाला ट्रम्प यांनी राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करणे हे दुर्दैवी आहे. "माझा संदेश हा चर्चच्या जागतिक मिशनचा भाग आहे. राष्ट्राध्यक्षांनी कदाचित गॉस्पेलचा संदेश समजलेला नाही, हे ऐकून मला दुःख झाले. परंतु, जगामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे माझे कार्य मी कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरुच ठेवीन," असे त्यांनी ठामपणे सांगितले. पोप लिओ यांनी हे देखील अधोरेखित केले की, ते ट्रम्प किंवा अन्य कोणत्याही नेत्यावर वैयक्तिक टीका करत नाहीत. त्यांचा उद्देश केवळ सर्वांना युद्धापासून परावृत्त करणे आणि सामंजस्याचे पूल बांधण्यासाठी आमंत्रित करणे हा आहे. ते कोणत्याही राजकीय वादात पडण्यास इच्छुक नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Pope Leo XIV Response to Donald Trump
"आम्हाला असा पोप नको!" डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मगुरुंवर थेट हल्ला; इराण युद्धावरुन पोप लिओ चौदावे आणि ट्रम्प यांच्यात जुंपली

या वादाची सुरुवात डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या सोशल मीडिया पोस्टने झाली. ट्रम्प यांनी फ्लोरिडावरुन वॉशिंग्टनला परतताना पोप यांच्यावर जोरदार टीका केली. ट्रम्प यांच्या मते, अमेरिका-जन्मित असलेले हे पोप आपले काम योग्य रीतीने करत नाहीत. ट्रम्प यांनी असाही सल्ला दिला की, पोप यांनी 'कट्टर डाव्या' विचारसरणीच्या लोकांना खुश करणे थांबवावे. विमानातून उतरल्यानंतर ट्रम्प यांनी जाहीरपणे सांगितले की, ते पोप लिओ यांचे चाहते नाहीत. "मला असा पोप नको आहे जो अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर टीका करेल, कारण मी तेच काम करत आहे ज्यासाठी मला जनतेने बहुमताने निवडून दिले आहे," असा दावाही ट्रम्प यांनी केला.

Pope Leo XIV Response to Donald Trump
Donald Trump: "मी राष्ट्राध्यक्ष व्हावं असं त्याला वाटत नव्हतं..." अल्पवयीन मुलींची तस्करी करणाऱ्या एपस्टीनसोबतच्या मैत्रीवर ट्रम्प बोलले

ट्रम्प यांनी अत्यंत आक्रमक भाषेत टीका करताना म्हटले की, "जर मी व्हाईट हाऊसमध्ये नसतो, तर लिओ व्हॅटिकनमध्ये नसते." त्यांनी पोप यांना राजकारणी न बनता केवळ धार्मिक प्रमुख म्हणून भूमिका निभावण्याचा सल्ला दिला. मात्र, पोप लिओ यांनी या सर्व टीकेला शांतपणे पण तितक्याच कणखरपणे उत्तर देऊन आपला शांततेचा अजेंडा कायम असल्याचे दाखवून दिले. जागतिक महासत्तेचा प्रमुख आणि सर्वोच्च धर्मगुरु यांच्यातील हा वैचारिक संघर्ष आता एका नव्या वळणावर पोहोचला असून याचे पडसाद आंतरराष्ट्रीय राजकारणात आणि धार्मिक वर्तुळात उमटताना दिसत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com