"आम्हाला असा पोप नको!" डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मगुरुंवर थेट हल्ला; इराण युद्धावरुन पोप लिओ चौदावे आणि ट्रम्प यांच्यात जुंपली

Donald Trump Criticizes Pope Leo XIV: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ख्रिस्ती धर्मीयांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप लिओ चौदावे यांच्यातील वाद आता विकोपाला पोहोचला.
Donald Trump Criticizes Pope Leo XIV
Donald TrumpDainik Gomantak
Published on
Updated on

Donald Trump Criticizes Pope Leo XIV: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ख्रिस्ती धर्मीयांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप लिओ चौदावे यांच्यातील वाद आता विकोपाला पोहोचला. इराण युद्धाच्या मुद्द्यावर पोप यांनी घेतलेल्या भूमिकेचा तीव्र निषेध करत ट्रम्प यांनी त्यांची कडक शब्दांत टीका केली. "परमाणू शस्त्रास्त्रे बाळगणे योग्य आहे, असे म्हणणारा पोप आम्हाला मुळीच आवडत नाही," अशा शब्दांत ट्रम्प यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, ते पोप लिओ यांचे चाहते नाहीत आणि परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत पोप यांची समज अत्यंत खराब आहे. जगाला उद्ध्वस्त करण्याची इच्छा ठेवणाऱ्या देशाशी (इराण) आपण मेहेरबानी दाखवावी, असे वाटणारा कोणताही व्यक्ती शांततेसाठी योग्य नसल्याचा दावा ट्रम्प यांनी केला.

Donald Trump Criticizes Pope Leo XIV
Donald Trump: "मी राष्ट्राध्यक्ष व्हावं असं त्याला वाटत नव्हतं..." अल्पवयीन मुलींची तस्करी करणाऱ्या एपस्टीनसोबतच्या मैत्रीवर ट्रम्प बोलले

पोप लिओ चौदावे हे पहिले अमेरिकन पोप आहेत, जे अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरु असलेल्या संघर्षावर सातत्याने भाष्य करत आहेत. गेल्या आठवड्यात त्यांनी इराणच्या जनतेविरुद्ध ट्रम्प यांनी वापरलेली प्रक्षोभक भाषा आणि दिलेल्या धमक्यांचा तीव्र निषेध केला होता. "आज रात्री एक संपूर्ण सभ्यता संपवून टाकू," असे विधान ट्रम्प यांनी युद्धविरामाच्या काही तास आधी केले होते, ज्याला पोप यांनी 'पूर्णपणे अस्वीकार्य' म्हटले होते.

Donald Trump Criticizes Pope Leo XIV
Donald Trump: "आंदोलकांना फाशी द्याल याद राखा!" ट्रम्प यांची इराणला खुली धमकी; आखाती देशांत युद्धाचे ढग गडद Watch Video

या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी प्रतिहल्ला चढवताना म्हटले की, "मला असा पोप नको आहे जो अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर टीका करेल." ट्रम्प यांनी असाही दावा केला की, लिओ हे पोप होण्याच्या शर्यतीत कुठेही नव्हते, परंतु राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना रोखण्यासाठीच चर्चने एका अमेरिकन व्यक्तीला या पदावर बसवले.

दुसरीकडे, ट्रम्प प्रशासन या युद्धाला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी या युद्धाला 'ईश्वरी समर्थन' असल्याचे सांगत धार्मिक ग्रंथांचा हवाला दिला. मात्र, पोप लिओ केवळ इराणच्या (Iran) मुद्द्यावरच नाही, तर जानेवारीत व्हेनेझुएलामध्ये निकोलस मादुरो यांना पकडण्यासाठी अमेरिकेने राबवलेल्या मोहिमेवरही नाराज होते. त्यांनी व्हेनेझुएलाच्या जनतेच्या इच्छेचा आदर करण्याचे आवाहन केले होते.

Donald Trump Criticizes Pope Leo XIV
Donald Trump: युद्धाच्या सावटात ट्रम्प यांचं 'थँक्यू' मिशन! 800 कैद्यांची फाशी रोखल्यानं अमेरिकेच्या भूमिकेत मोठा बदल; इराणवरील हल्ल्याच्या चर्चेला फाटा

धर्मगुरु आणि जागतिक महासत्ता असलेल्या देशाचा राष्ट्राध्यक्ष यांच्यातील हा संघर्ष आता केवळ राजकारणापुरता मर्यादित न राहता वैयक्तिक टीकेपर्यंत पोहोचला आहे. या वादामुळे अमेरिकेतील कॅथोलिक समुदायामध्ये आणि जागतिक स्तरावर संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, ट्रम्प यांच्या आक्रमक भूमिकेवर आंतरराष्ट्रीय स्तरावरुन काय प्रतिक्रिया उमटतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com