Nepal: म्हणून चीनवर विश्वास ठेवायचा नाही, नेपाळमधील 'ते' विमानतळ चीनच्या मदतीने बांधले होते

चीनच्या मदतीने बांधण्यात आलेले हे विमानतळ चीनच्या 'बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह'चा (BRI) एक भाग होता.
Pokhara International Airport
Pokhara International AirportDainik Gomantak
Published on
Updated on

नेपाळमध्ये रविवारी पोखरा विमानतळाजवळ एक प्रवासी विमान कोसळून (Nepal Plane Crash) जवळपास 68 लोकांचा मृत्यू झाला. यात अनेक परदेशी नागरिकांचा समावेश आहे. दरम्यान, यासंबधित आणखी एक माहिती समोर आली आहे.

नेपाळमधील पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (Pokhara International Airport) केवळ दोनच आठवड्यांपूर्वी उद्घाटन देशाचे नवनियुक्त पंतप्रधान पुष्प कमल यांच्या हस्ते करण्यात आले. विमानतळाचे 1 जानेवारी 2023 रोजी अधिकृतपणे उद्घाटन करण्यात आले.

Pokhara International Airport
Nepal Plane Crash Video Photos: नेपाळमध्ये कोसळलेल्या विमानाचा थरारक व्हिडिओ आणि फोटो आले समोर

विशेष बाब म्हणजे हे विमानतळ चीनच्या मदतीने बांधण्यात आले. हा महत्त्वाचा प्रकल्प चीनच्या 'बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह'चा (BRI) एक भाग होता.

'काठमांडू पोस्ट' या वृत्तपत्रानुसार, नेपाळ सरकारने मार्च 2016 मध्ये चीनसोबत विमानतळाच्या बांधकामासाठी कमी व्याजदरात 215.9 दशलक्ष डॉलर कर्जाचा करार केला होता.

गेल्या वर्षी चीनचे माजी परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी पोखरा प्रादेशिक आंतरराष्ट्रीय विमानतळ नेपाळचे तत्कालीन पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांच्याकडे सुपूर्द केले होते.

Pokhara International Airport
Nepal Plane Crash: नेपाळमध्ये विमान कोसळून 60 प्रवासी ठार

रविवारी पोखरा विमानतळावर उतरत असताना पाच भारतीयांसह 72 जणांना घेऊन जाणारे नेपाळी प्रवासी विमान नदीच्या दरीत कोसळल्याने किमान 68 जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती समोर आली आहे.

नेपाळच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाने (CAAN) दिलेल्या माहितीनुसार, यती एअरलाइन्सच्या 9N-ANC ATR-72 या विमानाने सकाळी 10:33 वाजता काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले. पोखरा विमानतळावर उतरत असताना जुने विमानतळ आणि नवीन विमानतळादरम्यान सेती नदीच्या काठावर हे विमान कोसळले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com