Nepal Plane Crash: नेपाळमध्ये रविवारी (15 जानेवारी) एक प्रवासी विमान कोसळले. हे विमान काठमांडूहून पोखराला जात होते. पोखरा विमानतळावर लँडिंगवेळी हा अपघात झाल्याचे समजते. तांंत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. या विमानात 68 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर्स होते. अपघात झालेले विमान यती एअरलाईन्सचे आहे. पोलिसांच्या माहितीनुसार या विमान अपघातात 60 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या अपघातानंतर नेपाळच्या मंत्रीमंडळाची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे.
अपघातानंतर प्रत्यक्षदर्शींनी धुराचे लोट पाहिले. काठमांडू येथे हवामान खराब होते आणि यती एअरलाइनच्या एटीआर-72 विमानाने वेळेवर उड्डाण केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, पायलट कॅप्टन कमल केसी हे विमान उडवत होते. पोखरा येथील सेती खोच येथे हे विमान कोसळले असून त्यानंतर विमानाला आग लागली. पोखरा विमानतळाचा परिसर डोंगर, टेकड्यांनी वेढलेला आहे. टेकडीला धडकून हे विमान कोसळल्याचे सांगितले जात आहे. विमानाचे काही व्हिडिओजही सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.
पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग करताना विमान दुर्घटनाग्रस्त झाले. त्यामुळे विमानाला आग लागली. घटनास्थळी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बचावकार्याला तत्काळ सुरवात केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार विमानाला हवेतच आग लागली होती आणि त्यानंतर विमान दुर्घटनाग्रस्त झाले. 72 प्रवासी क्षमता असलेले हे विमान होते. सध्या हे विमानतळ बंद ठेवण्यात आले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.