Pakistan: पीओकेमध्ये फडकणार 'तिरंगा'? बलुचिस्तान-बाल्टिस्तानचे लोक...

Pakistan Crisis: पाकिस्तान सध्या राजकीय संकटाबरोबर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईने लोक त्रस्त आहेत.
Pakistan Crisis
Pakistan CrisisDainik Gomantak

Pakistan Crisis: पाकिस्तान सध्या राजकीय संकटाबरोबर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईने लोक त्रस्त आहेत. यातच आता, पीओके म्हणजेच पाकव्याप्त काश्मीरमधून एक बातमी समोर आली आहे.

पीओकेमधील लोक स्वातंत्र्यासाठी आपला आवाज बुलंद करत आहेत. पाकिस्तान सातत्याने पीओकेवर आपला दावा सांगत आला आहे.

पण आता इस्लामिक देशांनी पाकिस्तानचा हा दावा फेटाळून लावला आहे. UAE ने PoK हा भारताचा अविभाज्य भाग असल्याची पुष्टी केली आहे.

दरम्यान, मोदी सरकारच्या काळात जम्मू-काश्मीरमध्ये वेगाने विकासकामे होत आहेत. भारतात आल्यानंतरच पीओकेचा कायापालट होऊ शकतो, हे पीओकेच्या लोकांना कळू लागले आहे.

लोक म्हणत आहेत की, कारगिल बॉर्डर खोला, आम्हाला भारतात (India) जायचे आहे. पीओकेचे लोक पाकिस्तान सरकारला सांगत आहेत की, जर तुम्हाला आम्हाला सुविधा द्यायच्या नसतील तर बॉर्डर खोला, आम्हाला भारतात जाऊ द्या.

Pakistan Crisis
Pakistan Political Crisis: पाकिस्तानची संसद बरखास्त, राष्ट्रपती अल्वींनी घेतला मोठा निर्णय

गेल्या काही दिवसांपासून पीओकेमध्ये निदर्शने पाहायला मिळत आहेत. इथे सर्वसामान्य लोक 'भारतात गेलो तर दोन वेळचे जेवण मिळेल आणि पाकिस्तानात राहिलो तर आमच्या राज्यकर्त्यांनी आमची बिले भरुन दोन वेळचे जेवण देऊ, असे वचन द्यावे' असे म्हणताना दिसत आहेत.

यातच वाढती महागाई (Inflation) आहे, वीजबिल भरमसाठ आहे, जगणे मुश्कील झाले आहे, असेही लोक म्हणताना दिसत आहेत.

दुसरीकडे, पाकिस्तानचा अपप्रचार आता चालणार नाही, कारण पाकिस्तान मुस्लिम देशांना खोटी आणि बनावट माहिती देत ​​आहे. G-20 च्या आधीही पाकिस्तानने G-20 सदस्य देशांना पत्र लिहूनव भारतासंबंधी खोटे आरोप केले होते.

गिलगिट बाल्टिस्तानचे लोक पाकिस्तान सरकारला सांगत आहेत की, तुम्ही तुम्हाला पाहिजे ते इथून घेऊन जात आहात, पण आमच्या जगण्यासाठीच्या रोजच्या गरजेच्या वस्तू तुम्ही आम्हाला देत नाहीत.

आमच्याशी असे वागायचे असेल तर बॉर्डर खोला, आम्ही भारतासोबत जाऊ. पाकिस्तानातील वस्तूंवर जितका अधिकार पाकिस्तानी जनतेचा आहे, तितकाच अधिकार गिलगिट बाल्टिस्तानच्या लोकांचाही आहे, पण तो मिळत नाही. पाकिस्तानने पीओकेला केवळ भूभाग म्हणून ठेवले आहे.

Pakistan Crisis
Pakistan Political Crisis: आता पाकिस्तानातील पत्रकार निशाण्यावर, लष्कराविरोधात बोलणाऱ्यांना...

संयुक्त राष्ट्रानेही पाकिस्तानला फटकारले

काश्मीरमधील मानवाधिकार उल्लंघनाचा मुद्दा पाकिस्तान सातत्याने यूएनमध्ये मांडत आहे, पण त्याला चोख प्रत्युत्तरही मिळत आहे.

आता UAE ने भारताचा नकाशा दाखवून पाकिस्तानला चांगलेच फटकारले. किंबहुना, भारताकडे बोट दाखवण्याआधी स्वत:च्या देशाची स्थिती पाहण्याची पाकिस्तानला ही थेट सूचना आहे.

दुसरीकडे, जम्मू-काश्मीरमधील जी-20 बैठकीबाबतही पाकिस्तानने प्रश्न उपस्थित केले होते, मात्र भारताने श्रीनगरमध्ये जी-20 बैठक घेऊन चोख प्रत्युत्तर दिले. त्यानंतर दिल्लीत झालेल्या G-20 नंतर जगभरात भारताचे कौतुक झाले, त्यात पाकिस्तानी लोकांचाही समावेश होता.

पाकिस्तानची आर्थिक स्थिती

पाकिस्तानची आर्थिक स्थिती बिकट होत चालली आहे. पीओके देखील यापासून दूर नाही. महागाई शिगेला पोहोचली आहे. लोकांना दोन वेळचे जेवण मिळत नाहीये. बेरोजगारी वाढत आहे. तेल आणि गॅसच्या किमती सातत्याने वाढत आहेत.

विजेचे बिल अनेक पटींनी वाढले आहे, मात्र याविरोधात कोणी आवाज उठवला तर पाकिस्तानी लष्कर त्यांचा आवाज दाबते. अशा स्थितीत पाकिस्तानातील सरकार आणि लष्करविरोधात लोक निदर्शने करत आहेत.

Pakistan Crisis
Pakistan Economic Crisis: कंगाल पाकिस्तानचे नशीबही फुटके, IMF ने पुन्हा दिला मोठा दणका; आता डिफॉल्ट होण्यापासून...

खरे तर, गिलगिट बाल्टिस्तानमधील लोकांना पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी नेहमीच उपेक्षित ठेवले आहे. जीवनावश्यक वस्तू आधी पाकिस्तानच्या इतर भागात पोहोचतात. त्यानंतर पीओकेला मिळतात. अनेकवेळा जीवनावश्यक वस्तूंचा इतका तुटवडा निर्माण होतो की, मुलांना उपाशी झोपावे लागते.

Pakistan Crisis
Pakistan Political Crisis: राजकीय संघर्ष होताच पाकिस्तानी नेते लंडनलाच का पळून जातात, इम्रान काय करणार?

इस्लामाबाद, कराची, लाहोर येथील लोकांनाही पाकिस्तानपासून स्वातंत्र्य हवे आहे

दरम्यान, पीओकेमध्येच केवळ पाकिस्तानपासून वेगळे होण्याचा आवाज बुंलद होत नाही तर, बलुचिस्तानमधूनही अशाच मागण्या केल्या जात आहेत.

गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये कारगिलची बॉर्डर खुली करण्याची मागणी जोर धरत आहे, तर बलुचिस्तानमध्येही लोक भारतात सामील होण्यासाठी रस्त्यावर उतरत आहेत. सिंध आणि पाकिस्तानच्या इतर प्रांतातूनही अशाच मागण्या केल्या जात आहेत.

पाकिस्तानच्या इस्लामाबाद, कराची आणि लाहोरसारख्या शहरात राहणारे लोकही सांगत आहेत की, पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी जनतेची काळजी घेतली नाही, तर लोक पाकिस्तान सोडून जातील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com