इस्लामाबाद: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री आणि इम्रान खान यांचे खास मेहमूद खान यांना इशारा दिला आहे. शरीफ म्हणाले की, जर सीएम खान (Imran khan) यांनी येत्या 24 तासांत लोकांना स्वस्त पीठ दिले नाही तर ते त्यांचे कपडे विकून लोकांना आटा पुरवतील.
पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी रविवारी ठाकारा स्टेडियमवर जाहीर सभेला संबोधित करताना ही माहिती दिली. ते म्हणाले, 'मी माझे वचन पुन्हा सांगतो, मी माझे कपडे विकून लोकांना स्वस्तात गव्हाचे पीठ पुरवीन.' माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानला महागाई आणि बेरोजगारीची आतापर्यंतची सर्वात मोठी भेट दिल्याचा आरोप शरीफ यांनी केला.
50 लाख घरे आणि एक कोटी नोकऱ्या देण्यात अपयशी ठरल्याबद्दल इम्रान सरकारचा निषेध करताना, पाक पंतप्रधान म्हणाले की, 50 लाख घरे आणि एक कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन पूर्ण करण्यात ते अपयशी ठरले आहेत. त्यांनी देशाला आर्थिक संकटात ढकलले. पाकिस्तानी वृत्तपत्र 'डॉन'च्या वृत्तानुसार, पीएम शरीफ रॅलीमध्ये म्हणाले, 'मी तुमच्यासमोर जाहीर करतो की, मी माझे प्राण देईन, पण देशाला समृद्धी आणि विकासाच्या मार्गावर नेवून ठेवेन.'
बलुचिस्तान निवडणुकांबाबत शरीफ म्हणाले की, लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवला आणि ते मतदान करण्यासाठी बाहेर पडले. 30 ते 35 टक्के मतदान होईल अशी माझी अपेक्षा होती, हा लोकशाही आणि कायदा व सुव्यवस्था सुधारणांवरचा लोकांचा विश्वास आहे.
पेट्रोल 180 आणि चीज 900 रुपये प्रतिकिलो
श्रीलंकेप्रमाणे पाकिस्तानातही आर्थिक संकट कोसळले आहे. एक लिटर पेट्रोलसाठी 179.86 रुपये, एक लिटर डिझेलसाठी 174.15 पाकिस्तानी रुपये. तर पाकिस्तानमध्ये एक लिटर दुधाची किंमत 144 पाकिस्तानी रुपयांवर गेली आहे.
त्याचप्रमाणे येथे ब्रेडचे पॅकेट 94 रुपयांना मिळते आहे. एक किलो तांदूळ घेण्यासाठी लोकांना180 ते 200 रुपये मोजावे लागतात. एका अंड्याला 16 रुपये तर एक किलो पनीर 904 रुपयांना मिळत आहे.
या देशांकडून घेतले कर्ज
चीनशिवाय पाकिस्तानने संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले आहे. पाकिस्तानवरील देशांतर्गत आणि विदेशी कर्ज 50 हजार अब्ज रुपयांच्या वर गेले आहे. एक वर्षापूर्वी प्रत्येक पाकिस्तानी व्यक्तीवर सुमारे 75 हजार रुपयांचे कर्ज होते.
चीनच्या कर्जामुळे आधीच संकटात सापडलेल्या पाकिस्तानची आर्थिक स्थिती आणखी दडपली आहे. या आर्थिक वर्षाच्या अखेरीस पाकिस्तानवरील एकूण विदेशी कर्ज 14 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या पुढे जाईल. यापैकी निम्मे कर्ज हे चीनच्या व्यावसायिक बँकांचे आहे. पाकिस्तानने या बँकांकडून प्रामुख्याने बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (BRI) संबंधित प्रकल्पांसाठी कर्ज घेतले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.