PM Modi 2021 मध्ये पाकिस्तानला जाणार होते? पाकिस्तानी पत्रकाराचा मोठा खुलासा

Pakistan: भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या वातावरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार होते?
PM Modi
PM ModiDainik Gomantak

Pakistan: भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या वातावरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार होते? हा प्रश्न सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

खरे तर, एका पाकिस्तानी पत्रकाराने दावा केला आहे की, पीएम मोदी पाकिस्तान दौऱ्यावर येणार होते. सगळा कार्यक्रम ठरलेला होता.

मात्र शेवटच्या क्षणी पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याबाबत दोन्ही देशांमध्ये कोणतीही चर्चा झाली नाही. दोन्ही देशांनी युद्धविराम करारावर सहमती दर्शवल्यानंतर पंतप्रधान मोदी एप्रिल 2021 मध्ये पाकिस्तानला भेट देण्याचा विचार करत असल्याचा दावा पाकिस्तानी पत्रकाराने केला आहे.

दरम्यान, दोन पाकिस्तानी पत्रकार हमीद मीर आणि जावेद चौधरी यांनीही पंतप्रधान मोदींच्या कथित प्रस्तावित पाकिस्तान दौऱ्याबद्दल कॉलम लिहिला आहे.

हा कॉलम प्रसिद्ध झाल्यानंतर त्याबाबत पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. हा मुद्दा पुन्हा एकदा पाकिस्तानच्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल झाला आहे.

पाकिस्तानचे तत्कालीन लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा आणि तत्कालीन पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पीएम मोदींच्या भेटीबाबत गंभीर होते.

PM Modi
Qamar Javed Bajwa on Pakistan: 'पाकिस्तान भारताशी युद्ध करु शकत नाही...'

दुसरीकडे, त्यांच्या व्हिडिओ शोमध्ये पत्रकार नसीम झहरा यांच्याशी झालेल्या चर्चेत मीर यांनी मोदींच्या दौऱ्याचा संबंध भारताशी चांगले संबंध निर्माण करण्याच्या प्रयत्नात जनरल बाजवा यांनी घेतलेल्या भूमिकेशीही जोडला.

कमर जावेद बाजवा यांची इच्छा होती की, पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानात (Pakistan) यावे आणि दोन्ही देशांमधील संबंध सौहार्दपूर्ण असावेत.

मात्र, शेवटच्या क्षणी इम्रान खान यांनी या चर्चेतून माघार घेतल्याचा दावा अहवालात करण्यात आला. पंतप्रधान मोदींच्या पाकिस्तान (Pakistan) दौऱ्यामुळे त्यांच्यासाठी राजकीय संकट निर्माण होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

या वर्षी जानेवारीमध्ये मीर आणि चौधरी यांनी पीएम मोदींच्या प्रस्तावित पाकिस्तान दौऱ्यावर एक कॉलम लिहिला होता.

ज्यामध्ये दावा करण्यात आला होता की, 2021 मध्ये पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला भेट देण्याचा आणि ऐतिहासिक हिंगलाज मंदिराला भेट देण्याचा कार्यक्रम होता.

PM Modi
Pakistan China: ईशनिंदा करणाऱ्या चीनच्या अधिकाऱ्याला पाकिस्तानात अटक, मृत्युदंडाची शिक्षा होणार?

तसेच, हिंगलाज मंदिरात दर्शन घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी इस्लामाबादमध्ये (Islamabad) इम्रान खान यांची भेट घेतली असती, असा दावा पाकिस्तानी पत्रकाराने आपल्या कॉलममध्ये केला होता.

आता तब्बल चार महिन्यांनंतर एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत मीर यांनी आपल्या कॉलममध्ये केलेल्या दाव्यांचा पुनरुच्चार केला आहे. ते म्हणाले की, बाजवा यांची भारतासोबतची ‘डील’ अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com