Qamar Javed Bajwa on Pakistan: पाकिस्तान सध्या आर्थिक संकटाबरोबर राजकीय संकटाचा सामना करत आहे. यातच पाकिस्तानी सैन्य भारतीय सैन्याच्या तुलनेत कुठेच नाही. यासोबतच भारताविरुद्ध लढण्यासाठी दारुगोळा आणि आर्थिक सामर्थ्य यांचा अभाव आहे.
पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी ही माहिती दिली. यूकेस्थित पाकिस्तानी मीडिया 'UK44'चे दोन ज्येष्ठ पत्रकार हमीद मीर आणि नसीम जहरा यांच्या शोमध्ये याचा उल्लेख करण्यात आला होता.
मीर यांच्या म्हणण्यानुसार, जनरल बाजवा यांनी हे मान्य केले की, पाकिस्तान भारताशी (India) युद्ध करु शकत नाही. कमांडर्स कॉन्फरन्सदरम्यान बाजवा यांनी हेही मान्य केले होते की, पाकिस्तानी लष्कर भारतीय लष्कराच्या तुलनेत कुठेच नाही.
मीर आणि जहरा यांच्यासमोर त्यांनी खुलासा केला की, पाकिस्तानी सैन्य भारतीय सैन्याशी लढण्यास असमर्थ आहे.
मीर आणि नसीम जहरा यांनी शो दरम्यान सांगितले की, जनरल बाजवा यांनी 2021 मध्ये भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी गुप्त चर्चा केल्याचा खुलासा केला होता.
युद्धबंदी जाहीर झाल्यानंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाकिस्तान (Pakistan) दौऱ्याचे नियोजन कसे झाले होते, याबद्दलही त्यांनी सांगितले होते.
भारतासोबतच्या नियंत्रण रेषेवर झालेल्या युद्धविरामानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाकिस्तानला जावे लागले. परराष्ट्र कार्यालयाला याची माहिती मिळताच त्यांनी इम्रान खानशी संपर्क साधला.
इम्रान खान म्हणाले की, मला याची माहिती आहे. या संदर्भात एनएसए अजित डोवाल यांच्याशी बोलणी सुरु आहेत, पण पंतप्रधान मोदींच्या पाकिस्तान दौऱ्याबद्दल मला कोणतीही माहिती नसल्याचे इम्रान म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.