Pakistan China: ईशनिंदा करणाऱ्या चीनच्या अधिकाऱ्याला पाकिस्तानात अटक, मृत्युदंडाची शिक्षा होणार?

पाकिस्तानच्या वादग्रस्त ईशनिंदा कायद्यानुसार या गुन्ह्यात मृत्युदंडाची शिक्षा आहे.
Arrested
ArrestedDainik Gomantak

Pakistan China: पाकिस्तानचा सर्वात जवळचा मित्र असलेल्या चीनच्या एका अधिकाऱ्याला ईशनिंदा (Blasphemy ) केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात इस्लाम आणि पैगंबर मुहम्मद यांचा अपमान केल्याच्या आरोपावरून पाकिस्तानी पोलिसांनी एका चिनी अधिकाऱ्याला ईशनिंदा केल्याच्या आरोपाखाली अटक केल्याचे पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले. पाकिस्तानच्या वादग्रस्त ईशनिंदा कायद्यानुसार या गुन्ह्यात मृत्युदंडाची शिक्षा आहे.

पाकिस्तानी पोलिसांनी ईशनिंदा करणाऱ्या आरोपीची ओळख चीनचा नागरिक तियान अशी केली आहे. त्याला रविवारी रात्री अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. धरण प्रकल्पावर काम करणाऱ्या शेकडो मजूर आणि स्थानिक लोकांनी तियानच्या अटकेसाठी दबाव आणण्यासाठी एक प्रमुख महामार्ग रोखला. त्याच्या अटकेच्या मागणीसाठी लोकांनी मोठी रॅलीही काढली.

नियाचे पोलीस प्रमुख नसीर खान यांनी स्थानिक वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील कोमेला शहरात ही रॅली झाली.

Arrested
USA Firing: अमेरिकेत वाढदिवसाच्या पार्टीत गोळीबार; चार ठार, अनेक जखमी

अटक करण्यात आलेला चिनी व्यक्ती "दासू धरण प्रकल्पातील अवजड वाहतुकीचा प्रभारी होता". त्याने प्रेषित मोहम्मद यांचा अपमान केल्याचा दावा तेथे काम करणाऱ्या मजुरांनी केला. पोलिसांनी सांगितले की, चिनी नागरिकाने इस्लामचा अपमान केल्याचे तपासात सिद्ध झाल्यास ईशनिंदा कायद्यांतर्गत त्याच्यावर कारवाई केली जाईल. असे तेथील पोलिस म्हणाले आहेत.

या प्रकरणात, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये कोमेला येथे चिनी आणि पाकिस्तानी बांधकाम कामगार राहत असलेल्या विस्तीर्ण कॅम्पसच्या बाहेर संतप्त जमाव निदर्शने करताना दिसत आहे. आंदोलक "अल्लाह हू अकबर" च्या घोषणा देताना ऐकू येत आहेत. व्हिडिओमध्ये सुरक्षा दलही जमावाला पांगवण्यासाठी हवेत गोळीबार करताना दिसत आहे.

पाकिस्तान या पुराणमतवादी मुस्लीम देशामध्ये जमावाने हल्ले करणे आणि ईशनिंदा केल्याचा आरोप असलेल्या लोकांची लिंचिंग करणे अत्यंत सामान्य बाब आहे. मानवी हक्क गटांचे म्हणणे आहे की पाकिस्तानमध्ये धार्मिक अल्पसंख्याकांना धमकावण्यासाठी आणि वैयक्तिक शत्रुत्व मिटवण्यासाठी ईशनिंदा आरोपांचा वापर केला जातो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com