Brazil's New President Lula: ब्राझिलमध्ये पुन्हा कम्युनिस्टांची सत्ता; लूला डा सिल्वा बनणार नवे राष्ट्राध्यक्ष

1 जानेवारी 2023 रोजी पदग्रहण करणार; 21 लाखाहून अधिक मतांनी बोल्सोनारोंचा पराभव
Lula Da Silva
Lula Da Silva Dainik Gomantak
Published on
Updated on

Brazil's New President Lula: लूला डा सिल्वा हे लॅटिन अमेरिकेतील सर्वात मोठा देश असलेल्या ब्राझिलचे नवे राष्ट्राध्यक्ष असणार आहेत. निवडणुकीत त्यांनी विद्यमान राष्ट्राध्यक्ष जाएर बोल्सोनारो यांचा तब्बल 21 लाख 39 हजार मतांनी पराभव केला आहे. (Lula Da Silva)

Lula Da Silva
China vs Taiwan Conflict: ड्रॅगनची पुन्हा घुसखोरी, तैवान सीमेजवळ चिनी विमानांनी घातल्या घिरट्या

लूला हे डाव्या विचारसरणीच्या कामगार पक्षाचे नेते आहेत. 1 जानेवारी 2023 पासून ते पद सांभाळतील. तोपर्यंत बोल्सोनारो काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष असतील. लूला हे सहाव्यांदा राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी उभे होते. यंदा ते विजयी ठरले. 1989 मध्ये त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. आता ते तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होणार आहेत. यापुर्वी 2003 पासून 2010 या काळात ते दोन वेळा राष्ट्राध्यक्ष होते. राजकारणात येण्यापुर्वी ते एका कारखान्यात कामगार म्हणून कार्यरत होते.

77 वर्षीय लूला यांनी भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाची सुरवात केली होती. भष्ट्राचारावरून त्यांनी बोल्सोनारो यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. लूला यांनाही यापुर्वी भ्रष्टाचाराच्या कारणावरून राष्ट्राध्यक्षपद सोडावे लागले होते. भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाल्यावर ते 580 दिवस तुरूंगात होते.

Lula Da Silva
China Tradition: इथे लग्नाच्या वेळी नवरी मुलीने रडणे आवश्यकच, रडत नसेल तर...

30 ऑक्टोबर रोजी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत दुसऱ्या फेरीतील मतदान झाले. त्यात सिल्वा यांना 50.90 % तर बोल्सोनारो यांना 49.10 % मते मिळाली. गेल्या महिन्यात पहिल्या फेरीत लूला यांना 48.4 % तर बोल्सोनारो यांना 43.23 % टक्के मते मिळाली होती.

दरम्यान, निवडणुकीत पराभूत झाल्यास डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणे निकाल स्विकारणार नाही, असे बोल्सोनारो म्हटले होते. त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रियेकडे जगाचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच ब्राझिलमध्ये हिंसाचार होण्याचाही धोका आहे. त्या पार्श्वभुमीवर प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात केला गेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com