Twitter's Indian Head: ट्विटरचे नेतृत्व करणाऱ्या 'या' भारतीयांविषयी माहिती आहे का?

मतभेदांमुळे कंपनीतून बाहेर; मस्क यांच्याशी जुळवून घेण्यात अपयश
Parag Agrawal Elon Musk Vijaya Gadde
Parag Agrawal Elon Musk Vijaya Gadde Dainik Gomantak
Published on
Updated on

Twitter's Indian Head: ट्विटर डील पुर्ण केल्याचे एलन मस्क यांनी जाहीर केले आहे. यानंतर मस्क यांनी कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल आणि कंपनीच्या मुख्य कायदेशीर सल्लागार विजया गडे यांना बाहेरचा रस्ता दाखवल्यावरून चर्चा सुरू झाली आहे. ट्विटरचे नेतृत्व करणारे पराग अग्रवाल आणि विजया गडे त्यांच्याविषयी जाणून घेऊया...

Parag Agrawal Elon Musk Vijaya Gadde
Elon Musk यांच्या टेकओवरनंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाउंट होणार पुन्हा रिस्टोअर ?

पराग अग्रवाल २०२१ च्या नोव्हेंबरमध्ये ट्विटरचे सीईओ बनले होते. तथापि, ट्विटरमध्ये ते 2011 पासून कार्यरत आहेत. ट्विटरचे सहसंस्थापक आणि माजी सीईओ जॅक डॉर्सी यांच्या जागी अग्रवाल यांची निवड झाली होती. तथापि, मस्क यांनी ट्विटर खरेदीची घोषणा केल्यापासून पराग आणि मस्क यांच्यात अनेक मुद्यांवरून मतभेद होते.

पराग यांचा जन्म मुंबईत झाला होता. मुंबईतील सेंट्रल स्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले आहे. त्यांनी आयआयटी मुंबई मधून कॉम्प्युटर सायन्समधून शिक्षण घेतले. त्यानंतर 2005 मध्ये त्यांनी याच विषयातून स्टॅनफर्ड विद्यापीठातून पीएच.डी. पुर्ण केली. पराग यांची आई निवृत्ती शिक्षिका तर वडील अणुउर्जा क्षेत्रात कायर्रत होते.

न्यूयॉर्क टाइम्सच्या माहितीनुसार डेटाबेसवर असलेल्या कमांडमुळे त्यांना ट्विटरमध्ये कामाचे दरवाजे उघडले गेले. पीएच.डी पुर्ण होण्याआधीच ते ट्विटरमध्ये जॉईन झाले होते. त्यानंतर कंपनीच्या इंजिनिअरिंग टीममध्ये ते महत्वाचा भाग बनले. पराग अग्रवाल हे नेहमीच लो प्रोफाईल राहिले. 2017 मध्ये ते कंपनीचे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर बनले होते. ट्विटरपुर्वी पराग मायक्रोसॉफ्ट, याहू आणि एटीअँडटी या कंपन्यात कार्यरत होते.

Parag Agrawal Elon Musk Vijaya Gadde
Twitter विकत घेताच एलन मस्क अ‍ॅक्शन मोडमध्ये, CEO पराग अग्रवाल यांची हकालपट्टी

विजया गडेदेखील ट्विटरमधून बाहेर?

दरम्यान, ट्विटरच्या लीगल हेड असलेल्या विजया गडे यांनाही मस्क यांनी पदावरून हटविल्याची चर्चा आहे. 47 वर्षांच्या विजया गडे या सिलिकॉन व्हॅलीत प्रसिद्ध आहेत. ट्विटरमध्ये सर्वाधिक पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. तथापि, मस्क यांनी ट्विटर खरेदीची घोषणा केल्यावर गडे यांचे जाणे निश्चित्त मानले जात होते.

हैदराबादमध्ये जन्मलेल्या विजया यांचे बालपण अमेरिकेतील टेक्सासमध्ये गेले आहे. त्यांनी कॉर्नेल आणि न्यूयॉर्क विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले आहे. 2011 मध्ये त्या ट्विटरमध्ये जॉईन झाल्या होत्या. त्या कंटेट मॉडरेशन आणि सेफ्टी पॉलिसीची जबाबदारी सांभाळत होत्या.

सन 2020 मध्ये ट्विटरवर राजकीय जाहिरातींवर बंदी घातल्याने त्या चर्चेत आल्या होत्या. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकांऊंट स्थगित करण्यामागे विजया गडे यांचीच भूमिका निर्णायक ठरली होती. गडे यांनीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांचे पुत्र हंटर बायडेन यांच्या लॅपटॉपमध्ये सापडलेल्या फायलींच्या आधारे लिहिलेल्या न्यू यॉर्क पोस्टची बातमी ट्विटरवर शेअर होण्यासापासून रोखले होते. त्यावेळी न्युयॉर्क पोस्टचे ट्विटर हँडल दोन आठवड्यांसाठी निलंबित केले गेले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com