नवी दिल्ली : चीन (china) आणि पाकिस्तान (Pakistan) आपले परमाणु हत्यार वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. स्टॉकहोम आंतरराष्ट्रीय पीस रिकर्च इंस्टीट्यूट (SIRI) च्या रिपोर्ट नुसार या वर्षी जानेवारी पर्यंत चीनकडे 350 तर पाकिस्तानकडे 165 आणि भारताकडे 156 परमाणु हत्यार आहे. एसआईपीआरआईच्या अभ्यासानुसार रशिया (Russia) आणि अमेरिका (America) यांच्याकडे साधारणतः 13080 परमाणु हत्यार आहेत.
भारताला चीन आणि पाकिस्तानच्या परमाणु हत्याराचा फार फरक पडणार नाही. भारतीय अधिकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार परमाणु संख्येपेक्षा त्याची डिलिवरी सिस्टीम महत्त्वाची आहे. भारतीय सेनेला 5 हजार किलो मीटर दूरपर्यंत मारा करणारी अग्नि-V इंटरकंटिनेंटल बैलिस्टिक मिसाईल मिळणार आहेत. या मिसाईलच्या माऱ्यात चीन आणि पाकिस्तान पूर्णपणे येऊ शकतात.
एसआईपीआरआईच्या आभ्यासानंतर असे सांगण्यात आले आहे की, चीन, पाकिस्तान आणि भारत आपल्या परमाणु शस्त्रांचा विस्तार करत आहेत. मागीलवर्षी जानेवारीपर्यंत चीनकडे 320, पाकिस्तानकडे 160 तर भारताकडे 150 परमाणु शस्त्रे होती. जगातील 9 देशांकडे परमाणु हत्यार आहेत. यात अमेरिका, रशिया, ब्रिटेन, फ्रान्स, चीन, भारत, पाकिस्तान, इजराइल, आणि उत्तर कोरिया हे देश परमाणु हत्याराने सुसज्ज आहे. चीन सातत्याने परमाणु हत्यारामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न करीत आहे. तर दुसरीकडे भारत आणि पाकिस्तान देखील परमाणु शस्त्रे वाढविण्यावर भर देत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.