Pakistan President Arif Alvi: नागरीकांचे खायचे वांदे अन् पाकिस्तानच्या राष्ट्रपतींना पगारवाढीची चिंता!

Pakistan President Alvi Salary Hike: पाकिस्तान सध्या राजकीय संकटाबरोबर आर्थिक संकटाचा सामना करत आहे.
Pakistan President Arif Alvi
Pakistan President Arif AlviDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan President Alvi Salary Hike: पाकिस्तान सध्या राजकीय संकटाबरोबर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. संपूर्ण देश कर्जात बुडाला आहे. गरिबीशी झुंजत आहे.

मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठीही पुरेसा निधी नाही. परकीय चलनाचा साठाही कमी होत चालला आहे. महागाई गगनाला भिडत आहे. फळे, भाजीपाल्याचे भाव भडकले आहेत. युद्धाभ्यास करण्यासाठी लष्कराकडे इंधन नाही.

दवाखान्यात औषधांची वनवा आहे. जनतेकडे पीठ आणि सिलिंडर नाही. बँक (Bank) खात्यात पैसे नाहीत. मात्र, अशा परिस्थितीची पर्वा न करता राष्ट्रपती आरिफ अल्वी यांना पगारवाढीची चिंता सतावत आहे.

राष्ट्रपतींना किती पगारवाढ हवी आहे?

राष्ट्रपती अल्वी यांना त्यांच्या पगारात चांगली वाढ हवी आहे. राष्ट्रपती अल्वी यांनी पगारवाढीची दोनदा मागणी केल्याचे पाकिस्तान (Pakistan) सरकारच्या कागदपत्रांवरुन समोर आले आहे. आलिशान कारचा शौक, पैशाची चिंता नाही, पण त्यांना हा पगार कमी वाटतो.

पहिल्यांदा त्यांनी 1 जुलै 2021 रोजी आणि दुसऱ्यांदा 1 जुलै 2023 रोजी पगार वाढवण्यासाठी पत्र लिहिले होते. पाकिस्तानच्या राष्ट्रपतींचे मासिक वेतन सध्या 8,46,550 पाकिस्तानी रुपये आहे. पण आजमितीला त्यांना 12,29,190 रुपये दरमहा पगार हवा आहे.

Pakistan President Arif Alvi
Pakistan: कंगाल पाकिस्तानात वीज बिलासाठी आत्महत्या, सरकार विरोधात लोक रस्त्यावर

सरन्यायाधीशांच्या पगारवाढीचा संदर्भ

'जियो टीव्ही'च्या वृत्तानुसार, राष्ट्रपती सचिवालयाने लिहिलेल्या विनंती पत्रात अल्वी यांनी लिहिले की, '2021 ते 2023 पर्यंत सरन्यायाधीशांच्या पगारात दुप्पट वाढ झाली आहे. राष्ट्रपतींच्या आदेशानुसार ही वेतनवाढ करण्यात आली.

1 जुलै 2021 पासून सरन्यायाधीशांचे वेतन 1,024,324 लाख रुपये प्रति महिना आणि 1 जुलै 2023 पासून 1,229,189 रुपये प्रति महिना होईल.

परंतु, राष्ट्रपतींचा पगार कोणत्याही सार्वजनिक पद धारकाच्या म्हणजेच पाकिस्तानच्या सरन्यायाधीशांच्या पगारापेक्षा एक रुपया अधिक या विहित तत्त्वानुसार वाढवला गेला नाही.

Pakistan President Arif Alvi
Pakistan Political Crisis: पाकिस्तानची संसद बरखास्त, राष्ट्रपती अल्वींनी घेतला मोठा निर्णय

मागणी पूर्ण झाल्यास मोठी थकबाकी मिळेल

राष्ट्रपतींच्या सचिवालयाच्या शिफारशीनंतर हे प्रकरण लॉ मंत्रालयासह वित्त विभागाकडे पाठवण्यात आले आहे.

22 ऑगस्ट रोजी राष्ट्रपतींच्या (पगार, भत्ते आणि विशेषाधिकार) अधिनियम, 1975 च्या चौथ्या अनुसूचीमध्ये सुधारणा करुन राष्ट्रपतींच्या वेतनात प्रस्तावित वाढीचे समर्थनही या ठरावाने केले. ही मागणी पूर्ण झाल्यावर त्यांना थकबाकीच्या स्वरुपात मोठी रक्कमही मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com