Global Hunger Index 2022: जागतिक उपासमार निर्देशांक 2022 ची नवी क्रमवारी जारी करण्यात आली आहे. या 121 देशांच्या क्रमावारीत भारत 107 व्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे दक्षिण आशियातील अफगाणिस्तान वगळता इतर सर्व देशांचे स्थान या क्रमवारीत भारतापेक्षा चांगले आहे.
गतवर्षी म्हणजेच 2021 च्या क्रमवारीत 116 देश होते, आणि त्यात भारत 101 व्या स्थानी होता. गतवर्षीही पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेशचे स्थान भारतापेक्षा चांगले होते. सन 2020 च्या क्रमवारीत 107 देशांच्या यादीत भारत 94 व्या स्थानी होता.
जागतिक उपासमार निर्देशांकाच्या ताज्या अहवालात भारताचे स्थान आणखी घसरल्याचे समोर आले आहे. शिवाय इतरही क्रमवारीत भारताचे स्थान चांगले नाही. या क्रमवारींमध्येही भारताची रँकिंग सातत्याने घसरत चालली आहे.
या क्रमवारीत श्रीलंका 64, नेपाळ 81, पकिस्तान 99, अफगानिस्तान 109, चीन सामुहिक रूपात 1 ते 17 या क्रमांकामध्ये आहे. हा निर्देशांक 0 ते 100 या अंकांमध्ये असतो. यात शुन्य हे स्थान सर्वात चांगले समजले जाते. भारताचा स्कोअर 29.1 सांगितला गेला आहे.
दरम्यान, याच वर्षी मानव विकास निर्देशांकात भारत 191 देशांच्या यादीत 131 व्या स्थानी होती. या क्रमवारीत नेपाळ आणि पाकिस्तान वगळता भारत इतर शेजारी राष्ट्रांच्या मागे होता. माध्यम स्वातंत्र्य निर्देशांकाचा अहवाल याचवर्षी मे महिन्यात आला होता. या 180 देशांच्या क्रमवारीत भारताचे स्थान 142 वरून घसरून 150 वर आले होते.
तर नेपाळ 76, श्रीलंका 146, पाकिस्तान 157, बांग्लादेश 162 आणि म्यानमार 176 व्या स्थानी होता. ब्रिटनच्या इकनॉमिस्ट इंटेलिजन्सच्या लोकशाही निर्देशांकात गतवर्षी भआरत 46 व्या स्थानी होता. 2020 मध्ये या यादीत 167 देशांमध्ये भारत 53 व्या स्थानी होता. तर 2019 मध्ये भारत 51 व्या स्थानी होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.