''भारत महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करतोय अन् आपण भीक....''; पाकिस्तानी खासदाराचा शाहबाज सरकारला घरचा आहेर

Pakistan Assembly Session: पाकिस्तान सध्या गंभीर अशा आर्थिक संकटाचा सामना करत आहे. दोन वेळच्या अन्नासाठी लोक संघर्ष करत आहेत.
Pakistan PM Shehbaz Sharif
Pakistan PM Shehbaz SharifDainik Gomantak

Pakistan Assembly Session: पाकिस्तान सध्या गंभीर अशा आर्थिक संकटाचा सामना करत आहे. दोन वेळच्या अन्नासाठी लोक संघर्ष करत आहेत. यासगळ्यामध्ये पाकिस्तानातून भारतासंबंधी एक बातमी आली आहे. या बातमीची पाकिस्तानात (Pakistan) तर चर्चा होतच आहे, परंतु भारतातदेखील (India) याची दखल घेण्यात आली आहे. पाकिस्तानी संसदेत (Pakistan Parliament) एका विरोधी पक्षाच्या खासदाराने भारताचे कौतुक करताना आपल्याच देशाच्या वाईट आर्थिक परिस्थितीचा उल्लेख केला.

नॅशनल असेंब्लीतील विरोधी पक्षनेते आणि JUI-F चे प्रमुख मौलाना फजलुर रहमान (Maulana Fazlur Rehman) म्हणाले की, ''एकीकडे भारत आहे जो महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, तर दुसरीकडे आपण दिवाळखोरी टाळण्यासाठी इतर देशांकडे भीक मागत आहोत.'' रहमान यांनी आपल्या भाषणादरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यावरही निशाणा साधला. पाकिस्तानात सरकारे महलांमध्ये बनवली जातात. आताही पडद्यामागून काही लोक निर्णय घेत आहेत. आपण फक्त कठपुतळी आहोत.

Pakistan PM Shehbaz Sharif
India Pakistan Trade: पाकिस्तानच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेला भारत देणार आधार? व्यापारासंबंधी शाहबाज सरकामधील मंत्र्याचं मोठं वक्तव्य

खरेतर, 2024 च्या संसदीय निवडणुकांनंतर पाकिस्तानमध्ये नवीन सरकार स्थापन झाले, परंतु परिस्थिती अजूनही सुधारलेली नाही. हेराफेरी करुन सरकार स्थापन करणाऱ्या शाहबाज शरीफ यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. नवीन सरकार (Government) स्थापन झाल्यानंतर पाकिस्तानच्या आर्थिक दुरवस्थेबाबत ठोस निर्णय घेतले जातील असे सांगण्यात आले होते, मात्र यामध्ये थोडासाही फरक पडलेला नाहीये. शाहबाज शरीफ सतत इतर देशांना भेटी देत ​​आहेत. इतर देशांनी केलेल्या आर्थिक मदतीच्या जोरावर सध्या पाकिस्तान सरकार चालत आहे. परिस्थिती अशी आहे की, आता खासदारांनीही शाहबाज शरीफ सरकारविरोधात बंड करण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, आता खासदार शाहबाज शरीफ यांच्यावर उघडपणे टीका करत आहेत. नॅशनल असेंब्लीतील भाषणात मौलाना फजलुर रहमान यांनी शरीफ सरकारवर सडकून टीका केली. रहमान म्हणाले की, ''एकीकडे भारत महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहत आहे आणि दुसरीकडे आपण दिवाळखोरी टाळण्यासाठी भीक मागत आहोत. याला जबाबदार कोण?''

Pakistan PM Shehbaz Sharif
Pakistan Army vs Police: ''भारतातही अशा घटना घडतात, पण...'' लष्कर आणि पोलिस यांच्यातील संघर्षामध्ये पाकिस्तानने असे का म्हटले?

एआरवाय न्यूजमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, मौलाना फजलुर रहमान यांनी पाकिस्तानच्या दुर्दशेसाठी पडद्यामागून निर्णय घेत असलेल्या अदृश्य शक्तींना जबाबदार धरले. त्यांनी निवडून आलेल्या सरकारला कठपुतळी बनवल्याचा घणाघात रहमान यांनी केला.

दुसरीकडे, रहमान यांनी संसदेच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन लोकशाही विकल्याचा आरोप केला. रहमान पुढे म्हणाले की, ''आपल्या देशातील सरकारे मोठ-मोठ्या महलांमध्ये बनवली जातात आणि नोकरशहा पंतप्रधान कोण होणार हे ठरवतात. आपण किती काळ अशी तडजोड करत राहणार आहोत. खासदार म्हणून निवडून येण्यासाठी आपण किती काळ बाहेरील शक्तींची मदत घेणार आहोत."

Pakistan PM Shehbaz Sharif
Pakistan Boat Capsized: पाकिस्तानात सिंधू नदीत बोट उलटल्याने 15 जण बुडाले, 4 बेपत्ता

दरम्यान, रहमान यांनी 2018 आणि 2024 या दोन्ही सार्वत्रिक निवडणुकीत झालेल्या धांदलीचा आणि बनावट प्रतिनिधी सत्तेवर आल्याचा आरोप केला. देशवासीय असुरक्षिततेने त्रस्त असून आमच्या सरकारने त्याबाबत जागे होण्याची गरज असल्याचा दावा रहमान यांनी केला. त्यांनी विचारले की, "या सभेत बसून आपली सद्सद्विवेकबुद्धी कशी स्पष्ट होईल, कारण पराभूत आणि जिंकणारे दोघेही समाधानी नाहीत."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com