Gurdwara Shooting in California US
Gurdwara Shooting in California USDainik Gomantak

Gurdwara Shooting in California: कॅलिफोर्नियातील गुरुद्वारात बेशुट गोळीबार, दोन जणांची प्रकृती चिंताजनक

दोन लोकांमध्ये गोळीबार झाला असुन दोघे गंभीर जखमी झाले.
Published on

Gurdwara Shooting in California US: अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील सॅक्रामेंटो काउंटीमध्ये रविवारी (26 मार्च) मध्यरात्री एका गुरुद्वारामध्ये गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे.

वृत्तानुसार, येथे दोन लोकांमध्ये गोळीबार झाला, ज्यामध्ये दोघे गंभीर जखमी झाले. काउंटी शेरीफच्या कार्यालयाने सांगितले की गोळीबार दोन परिचितांमध्ये झाला. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 

Gurdwara Shooting in California US
Aadhaar-PAN Link : आधार-पॅन 31 मार्चपूर्वी लिंक करा : मुख्यमंत्री सावंत

संपूर्ण घटना काय आहे?
या गोळीबाराचा द्वेषाच्या गुन्ह्याशी संबंध नाही. कारण गोळीबारात सहभागी असलेले तिघेजण एकमेकांच्या ओळखीचे होते. त्यांनी सांगितले की, यापूर्वी काही कारणावरून दोघांमध्ये भांडण झाले होते.

त्यानंतर एका संशयिताने आपली बंदूक बाहेर काढली आणि भांडणात सहभागी असलेल्या दुसऱ्या व्यक्तीच्या मित्रावर गोळी झाडली. यानंतर गोळी न लागलेल्या व्यक्तीने बंदूक काढून पहिल्या व्यक्तीवर बेछुट गोळीबार केला आणि घटनास्थळावरून पळ काढला. 

Gurdwara Shooting in California US
US Air Force: अभिमानास्पद! अमेरिकेच्या हवाई दलाच्या सहाय्यक संरक्षण सचिवपदी भारतीय वंशाचे रवी चौधरी

नगर कीर्तनाच्या निमित्ताने ही घटना घडली रविवारी गुरुद्वारामध्ये नगर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारो लोक गुरुद्वारामध्ये जमा झाले होते. सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com