
Pakistani Entrepreneur Thrashes Hindu Man: पाकिस्तानात हिंदूंना कसे वागवले जाते हे अवघ्या जगाला माहिती आहे. यातच आता सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमुळे पाकिस्तानात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराची पोलखोल झाली. पाकिस्तानी मीडिया उद्योजक सलमान फारुक यांचा एका हिंदू तरुणाला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. पाकिस्तानची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कराची शहरातील पॉश भागात असलेल्या डिफेन्स सोसायटीमध्ये ही घटना घडली.
बायोनिक फिल्म्सचे मालक सलमान फारुक यांनी एका हिंदू (Hindu) तरुणाला मारहाण केली. त्याची मोटारसायकल फारुक यांच्या कारला धडकल्याने त्यांचा संताप अनावर झाला. त्यांनी कारमधून उतरुन त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. सुधीर धुन राज असे या हिंदू तरुणाचे नाव आहे. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ सलमान फारुक यांना अटक केली.
माध्यमांमधील वृत्तानुसार, सुधीर कराचीतील (Karachi) डिफेन्स सोसायटी परिसरातून त्याची बहीण कल्पनासोबत मोटारसायकलवरुन जात होता. यादरम्यान, तो इत्तेहाद परिसरातून जात असताना त्याची दुचाकी सलमान फारुख यांच्या कारला धडकली. यानंतर फारुख आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी सुधीर राजला पकडले आणि त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये सलमान फारुक सुधीर यांनी राजचा हात धरुन कारमध्ये बसवले. त्याचवेळी, कारमध्ये बसलेल्या सुरक्षा रक्षकाने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. यादरम्यान सुधीरची बहीण कल्पना सलमान फारुकसमोर हात जोडून विनवणी करत राहिली, तिच्या भावाला सोडण्यासाठी दयेची भीक मागत राहिली पण तिच्या विनवणीकडे फारुक यांनी सपशेल दुर्लक्ष केले.
एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, प्रत्यक्षदर्शी मोहम्मद सलीम यांच्या तक्रारीवरुन गिझरी पोलिस ठाण्यात सलमान फारुक यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. फारुक यांच्यावर जीवे मारण्याची धमकी देणे, शारीरिक हल्ला करणे, शिवीगाळ करणे आणि महिलेला त्रास देणे असे आरोप करण्यात आले. एआरवाय न्यूजच्या वृत्तानुसार, कराची न्यायालयाने सलमान फारुक आणि आणखी एका आरोपीला दोन दिवसांच्या पोलिस कोठडी सुनावली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.