Viral Video: हे केवळ पाकिस्तानात होऊ शकतं! मॅनहोलचं झाकण चोरण्यासाठी आलिशान कारमधून आले चोर; यूजर म्हणाले...

Viral Video In Pakistan: अलीकडेच कराचीतील अशाच एका व्हिडिओने लक्ष वेधले, जो पाहिल्यानंतर नेटिझन्सना हासू आवरता येत नाही. 49 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की पाकिस्तानमध्ये लोक काय करु शकतात.
Viral Video
Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

पाकिस्तान हा असा देश आहे, जिथे कष्टाळू लोकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते, पण येथील चोरांची 'प्रगती' पाहून तुम्हीही म्हणाल 'भाई वाह!' अलीकडेच कराचीतील अशाच एका व्हिडिओने लक्ष वेधले, जो पाहिल्यानंतर नेटिझन्सना हासू आवरता येत नाही. 49 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की पाकिस्तानमध्ये लोक काय करु शकतात.

आधी हा व्हिडिओ पाहा...

दरम्यान, हे मॅनहोलचे झाकण चोरीचे प्रकरण आहे, पण चोरांनी वापरलेली पद्धत थोडी हटके होती. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की, एक चमकदार कार रस्त्याच्या कडेला येऊ थांबते. मग दोन सज्जन प्रकारचे चोर त्यातून बाहेर उतरतात. त्यानंतर ते मॅनव्होलवरील झाकण कुणालाही न कळता आरामात उचलून कारमध्ये ठेवून तिथून पळ काढतात.

Viral Video
Viral Video: उन्हापासून बचावासाठी पठ्ठ्यानं लढवली शक्कल; सोशल मीडियावर देसी जुगाड व्हायरल!

कराचीच्या महापौरांनी व्हिडिओ शेअर केला

कराचीचे 27 वे महापौर मुर्तजा वहाब सिद्दीकी यांनी x@murtazawahab1 वर हा व्हिडिओ शेअर करताच, कमेंट्सचा पूर आला. त्यांच्या पोस्टवर पाकिस्तानी लोकांनी संताप व्यक्त केला. एकूणच या व्हिडिओने पाकिस्तानच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीबद्दल एक कटू सत्य समोर आणले.

Viral Video
Viral Video: 'बिकिनी घातलेल्या फॉरेनरसाठी आणलीय साडी'; सासु - सुनेचा गोव्यातला धम्माल व्हिडिओ

पाकिस्तानी लोकांनी 'जखमेवर मीठ चोळले' अशा कमेंट्स केल्या!

एका यूजरने व्यंग्यात्मक स्वरात कमेंट केली की, ज्या देशात चोर आलिशान गाड्यांमधून येतात, त्या देशाची काय अवस्था असेल. तर दुसऱ्याने लिहिले, पाकिस्तानमध्ये (Pakistan) चोरांचेच राज्य आहे. शाहबाज शरीफ यांच्या राजवटीत देशाची अवस्था अशी झाली आहे की मॅनहोलचे झाकण चोरण्याची लोकांवर वेळ आली. तिसऱ्याने लिहिले, चोर सधन कुटुंबातील असल्याचे दिसते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com